North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी मिळवा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Mar 2024 07:00 PM
Nashik : लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन 

लाचखोरी प्रकरणातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोसावी यास सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्‍त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात कारवाई करताना आदेश जारी केले आहेत. संशयित लाचखोर असलेल्‍या शंकर गोसावी यांची पोलिस दलातील पाच वर्षांचा कार्यकाळ उरलेला होता.

घरफोडी करणारे तीन जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई येथील वसई पश्चिम भागात एका वृद्धेच्या घरी घरफोडी करून साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपये घेऊन रेल्वेने पळून जाणाऱ्या तीन चोरट्यांना नाशिकरोड सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 

पेट्रोलपंपाच्या नावाखाली तब्बल 46 लाख 44 हजारांची फसवणूक

पेट्रोलपंप सुरु करण्यासाठी परवानगी मिळवून देण्याची बतावणी करत किराणा व्‍यापाऱ्याची भामट्यांनी तब्‍बल ४६ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. वेगवेगळ्या बँक खात्‍यांमध्ये पैसे जमा करूनही संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्‍याने आपली फसवणूक झाल्‍याचे व्‍यापाऱ्याच्या लक्षात आल्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्‍यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. 

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक घडामोडी मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.