Nashik MNS Protest : राज्यभरात रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गाजत असून आज सभागृहात देखील याबाबत लक्षवेधी घेण्यात आली. दुसरीकडे रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील रस्त्यांना वैतागून मनसेने हटके आंदोलन केले आहे. रस्त्यातील खड्ड्यात (Nashik Pathole) भात लावून रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. 


नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील रस्ते बिकट अवस्थेत असून अनेक भागातील रस्ते (Nashik Road) हे वर्षभरापूर्वी केले असताना देखील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. पेठ तालुक्यातील करंजाळी - हरसूल रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Nashik MNS) वतीने या मार्गावर भात लावा' आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी भाताची रोपे रस्त्यांच्या खड्ड्यात लावून गाणी म्हणत अनोखे आंदोलन केले. यावेळी मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.


दरम्यान करंजाळी- हरसूल रस्ता काही वर्षांपूर्वी झाला असून रस्त्याचे काम सुरू असताना लगतच्या गावकऱ्यांनी निकृष्ट कामाबद्दल वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था झाली असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे तालुका प्रमुख सुधाकर राऊत व महिला आघाडी तालुका प्रमुख मनीषा घांगळे यांच्या नेतृत्वाखाली भात लावा आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील सर्वच रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, यावर पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास तहसील कार्यालया समोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 


Nashik School Student : शालेय विद्यार्थ्यांना त्रास 


करंजाळी हरसूल रस्त्यासह तालुक्यातील इतर रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे महिला, शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. करंजाळी-हरसूल रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे झालेला नाही. सर्व रस्त्यांच्या सुधारण्याबाबत 15 दिवसांत निर्णय न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आला. पेठ तालुक्यात बहुतांश भागात अद्यापही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सर्वसामान्य जनता गेली कित्येक वर्षे दुरावस्थेत असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्येच पाऊल ठेवून आहे. करंजाळी -हरसूल रस्त्याच्या निकृष्ट कामामागे कुणाचा आशीर्वाद आहे, हे शोधून कारवाई होण्याची गरज असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली.


ही बातमी वाचा: