Nashik Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावलाय. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील या जागेसाठी आग्रही होते. मात्र छगन भुजबळांनी अचानक काल पत्रकार परिषद घेत नाशिकच्या उमेदवारीवरून माघार घेतली. 


छगन भुजबळांच्या माघारीनंतर ही जागा शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Group) सुटेल, असे बोलले जात आहे. मात्र आता शिवसेना शिंदे गटातदेखील दोन गट पडले आहेत. एकीकडे खासदार हेमंत गोडसे यांनी अनेक वेळा ठाणे येथे जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या घरासमोर आंदोलने केली. तर शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिकमधून लोकसभा (Nashik Lok Sabha Constituency) लढवण्याची तयारी दर्शवली. 


नाशिकचा तिढा अजूनही तसाच


त्यामुळे अजूनदेखील नाशिकच्या जागेचा तिढा तसाच असल्याचे बोलले जात आहे. छगन भुजबळ यांनी काल नाशिक लोकसभेची जागा आपण लढवणार नाही असे सांगितले. ⁠छगन भुजबळ यांची उमेदवारी मोदी आणि शाह यांनी पक्की करूनही नाशिकची जागा अजून कुणाच्या पारड्यात पडणार हे स्पष्ट नाही. ⁠


नाशिकची जागा नेमकी कोणाला मिळणार?


कारण भुजबळांनी माघार घेतल्यानंतर अनेक तास उलटूनही शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे नाशिकचा तिढा अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. ⁠राष्ट्रवादीने नाशिकच्या बदल्यात सातारा लोकसभा सोडली पण आता नाशिक सोडावी लागली तर राष्ट्रवादीला नवीन कुठली जागा देणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ उमेदवारी जाहीर केली आहे.  आता नाशिकची जागा महायुतीत नेमकी कोणाला मिळणार?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


नाशिकची रामरथ मिरवणूक बनली 'राजकीय आखाडा', लोकसभा निवडणुकीआधी हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे प्रभू श्रीराम चरणी लीन!


Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!