Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत (Mahayuti) तिढा निर्माण झाला होता. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून माघार घेत असल्याची मोठी घोषणा केली. आता छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) नक्की माघार का घेतली? याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिक, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत कायम आहे. या मतदारसंघावरून महायुतीत एकमेकांवर दबाबतंत्राचा वापर सुरु आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. तसेच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या घराबाहेर आंदोलन करताना दिसून आले होते. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारीच जाहीर करून टाकली होती. त्यानंतर महायुतीत नाराजीचा सुरु पाहायला मिळत होता.  


छगन भुजबळांनी नाशिक ऐवजी शिरूरमधून लढण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा 


आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अशी इच्छा होती की छगन भुजबळांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Constituency) राष्ट्रवादीकडून निवडणुकीला सामोरे जावे. मात्र छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांच्या मागणीला विरोध करण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढू, अशी इच्छा छगन भुजबळांनी व्यक्त केली होती, असे समजते. 


छगन भुजबळांनी माघार का घेतली?


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या (Ratnagiri Sindhudurg Lok sabha Constituency) तडजोडीत नाशिकची जागा शिंदे गटाला देण्यात येईल ही बाब लक्षात आल्याने छगन भुजबळ यांनी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत स्वतः आपली उमेदवारी मागे घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. 


भुजबळांच्या योग्य निर्णय घेतला - हेमंत गोडसे


दरम्यान, भुजबळांच्या माघारीनंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) म्हणाले की, अमित शाह यांनी नाव सुचवले असे भुजबळ म्हणाले. पण, एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, आपला ठरत नसल्याने आणि वेळ कमी असल्याने भुजबळांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकचा तिढा आता सुटला आहे.  नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार आहे. महायुतीतील सर्व घटक एकत्र काम करतील, असे ते म्हणाले. 


नाशिकमधून कोण निवडणूक लढवणार हे मुख्यमंत्री ठरवतील - संजय शिरसाट


शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, नाशिकच्या जागेचा कोणताच तीढा नव्हता. मी आधीपासून हे सांगत आलोय. आधी त्यावर शिक्कामोर्तब झालंय. नाशिकची जागा शिवसेनेकडे आहे. ही जागा शिवसेनाच लढवेल. अजय बोरस्ते की गोडसे? नाशिकमधून कोण निवडणूक लढवणार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील, असे त्यांनी म्हटले आहे.   


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal: अजितदादा म्हणाले, अमित शाहांनी नाशिकमधून तुम्हाला लढायला सांगितलंय; आश्चर्यचकित झालेल्या भुजबळांचा फडणवीसांना फोन