नाशिक : अवघ्या काही दिवसांवर आदिशक्तीच्या उदो उदो करणारा नवरात्रौउत्सव (Navratri 2023) येऊन ठेपला आहे. या काळात लाखो भाविक सप्तशृंगीच्या दर्शनासाठी (Saptshrungi Gad) गडावर जात असतात. मात्र याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने गडावर जात प्रसादाच्या दुकानांची तपासणी करत दहा पेढा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आल्याने भाविकांच्या जीविताशी पेढा विक्रेते (Sweet Dealers) खेळत असल्याचे समोर आले आहे.
नवरात्रीत राज्यभरातून भाविक सप्तशृंगी देवीच्या (Saptshrungi Devi Mandir) दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर वर्षभरही भाविकांचा गडावर राबता असतो. पुढील आठवडयापासून सुरु होणा-या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभुमीवर सप्तश्रृंगी गड (Saptshrungi Gad) वणी या ठिकाणी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्याठिकाणी लोक प्रसाद म्हणून पेढे, कलाकंद इत्यादींची खरेदी करतात. त्यामुळे भाविकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळण्याकरिता अन्न व औषध प्रशासन नेहमीच तत्परतेने कार्यरत असते. त्याचाच भाग म्हणून प्रशासनामार्फत सप्तश्रृंगी गडावर तपासणी मोहिम राबविण्यात येवून आली यात दहा पेढे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांकडे विक्रीसाठी असलेल्या मालावर कुठल्याही प्रकारचे बेस्ट बिफ़ोरचे टॅग (Best Before) न देण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान सप्तशृंगी गडावरील विक्रेते अक्षय रामचंद्र बाटै यांचे आई भगवती पेढा सेंटर, कुंडलिक ईश्वर शिंगटे यांचे भगवती पेढा सेंटर, रणजित नागनाथ सायकर यांचे आई साहेब पेढा सेंटर, हनुमंत परसु यादर यांचे पेढा विक्री केंद्र, केशव श्रीरंग खुणे यांचे आराध्या पेढा सेंटर, गौरख दादा हरी साळुंके यांचे भगवती प्रसाद पैढा सेंटर, संदीप शशीकांत बेनके यांचे पेठा विक्री केंद्र, विठ्ठल रावसाहेब शिंदे यांचे जय माँ सप्तश्रृंगी पेढा सेंटर, संदीप नारायण अडगळे यांचे भगवती पैदा सेंटर, प्रल्हाद नामदेव गव्हाणे यांचे मयुरी प्रसाद पेढा सेंटर आदी 10 विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. परंतू त्यावर कुठल्याही प्रकारचे अंतिम टिकण्याची क्षमता (best before) याबाबतचे टॅग नसल्याचे आढळले. तसेच अन्न सुरक्षा मानके कायदयाच्या स्वच्छतेविषयक बाबींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व पैढ़ा विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा मानके कायदयाच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे.
नवरात्रीत आदिशक्तीचे 24 तास दर्शन
सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानने (Shree Saptashrungi Nivasini Devi) भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवात भाविकांना सप्तशृंगीदेवी चे 24 तास दर्शन खुले राहणार आहे. सर्व शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत आदींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रीत राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान या कालावधीत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सप्तशृंगगड येथे सप्तशृंगी देवीची दर्शन व्यवस्था 24 तास सुरू राहणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री भगवती - श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत दर्शनासाठी 24 तास खुले ठेवून भाविकांना श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी :