Nashik latest news updates : नाशिक शहरासह (Nashik City News) जिल्ह्यात नाशिक पोलिसांकडून दिवसेंदिवस नायलॉन मांजा विक्री (Manja) आणि वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आज झालेल्या कारवाईत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तीन संशय त्यांना पोलिसांनी अटक करत नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. 

 

अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांती (Makar Sankranti 2023)  सण आला असून या सणाला मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात. मात्र यावेळी नागरिक सर्रास बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करताना दिसून येतात. मात्र तत्पूर्वीच बाजारात बेकायदेशीर नायलॉन माजांची विक्री केली जाते. त्यामुळे प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होऊन जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे सदर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत नायलॉन मांजाच्या विक्री करणाऱ्या विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

  36 हजार 600 रुपयांचे 62 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त


नाशिक पोलीस गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक दोनचे पोलीस शिपाई राहुल पालखेड यांना मिळालेल्या माहितीनुसार कन्हैयालाल किशनचंद शर्मा हा अवैधरीत्या नायलॉन मांजाची विक्री करताना मिळून आल्याने त्याच्याकडून 11 हजार रुपयांचे नायलॉन मांजाचे 20 नगांसह ताब्यात घेण्यात आले असून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेला माहितीनुसार चेतन रघुनाथ जाधव, अजय भारत कुमावत हे अवैधरीत्या नायलॉन मांज्याची विक्री करताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 25 हजार 600 रुपयांच्या वेगवेगळ्या कंपनीचे नायलॉन मांद्याचे 42 गट्टू मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यात  36 हजार 600 रुपयांचे 62 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले आहे.

 

पोलिसांकडून आवाहन

 

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस आयुक्त यांनी नायलॉन मांज्याची खरेदी विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. याबाबत स्वतंत्र अधिसूचनाचे अधिकारण्यात आले आहे यानुसार शहरात कोणीही या अधिसूचनेचे उल्लंघन करू नये अन्यथा त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नायलॉन मांजा खरेदी-विक्री विरोधी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


 

ही बातमी देखील वाचा