PHOTO: भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या औरंगाबादेतील सभेत रिकाम्या खुर्च्यांचीच चर्चा अधिक! जेपी नड्डांचं भाषण सुरु असतानाच अर्धे मैदान रिकामे

औरंगाबादमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. मात्र आज सभेत प्रचाराच्या ऐवजी रिकाम्या खुर्च्यांची चर्चा अधिक होती.

Aurangabad BJP JP Nadda Rally

1/9
औरंगाबादमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
2/9
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भाजपाने औरंगाबाद लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला.
3/9
केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाड्यातल्या आठही लोकसभा मतदारसंघात भाजपा निवडणूक लढवण्याची तयारी करते आहे.
4/9
मात्र आज सभेत प्रचाराच्या ऐवजी रिकाम्या खुर्च्यांची चर्चा अधिक होती.
5/9
त्याचं झालं असं की केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड भाषणाला उभे राहिले आणि सभेसाठी आलेल्या महिला निघून जाऊ लागल्या.
6/9
काही वेळातच स्टेजची उजवी बाजू अक्षरशा रिकामी झाली.
7/9
यावेळी विजया रहाटकर यांनी स्टेजच्या खाली आल्या महिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही.
8/9
जे पी नड्डा यांचे भाषण संपत नाही तोपर्यंत अर्ध्यापेक्षा अधिक ग्राउंड रिकामं झालं होतं.
9/9
यावरुन शिवसेना ठाकरे गटानं टीका देखील केली आहे.
Sponsored Links by Taboola