एक्स्प्लोर

डॉक्टर रुग्णांच अनोख नातं, यशस्वी ऑपरेशन झालं, रुग्णाने कलेतून मानले आभार

Nashik Latest News update: घराची परिस्थिती हलाखीची. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणतात तसे अचानक दोन्ही पायाचे खुबे अकाली निकामी झालेले.

Nashik Latest News update: घराची परिस्थिती हलाखीची. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणतात तसे अचानक दोन्ही पायाचे खुबे अकाली निकामी झालेले. अनेक दवाखान्यांत घिरट्या घातल्या, मात्र कुठे खर्च परवडेनासा तर कुठे निदान होत नव्हते. अखेर कंटाळून पुन्हा ते घरी परतले. यानंतर नाशिकच्या एसएमबीटी रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाचे दोन्हीही पायाच्या खुब्यांवर यशस्वी सांधेरोपण करण्यात आले. या रुग्णावर यशस्वी शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाने ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांचे अनोखे चित्र रेखाटत डॉक्टरांचे आभार मानले. 

घटना आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मूळ रहिवाशी असलेले संदीप मुरलीधर बोधडे यांची. बोधडे सध्या कुटुंबीयांसोबत नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे वास्तव्यास आहेत. ते कलाकार असून घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी अनेक दवाखाने पालथे घातले. मात्र, दवाखान्याचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. यानंतर त्यांच्या एका मित्राने एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी ओपीडीमध्ये डॉक्टर मनोज काशिद यांच्याकडे तपासणी केली. सर्व घरची परिस्थिती आणि आतापर्यंत विविध दवाखान्यांत मारलेले हेलपाटे याबाबत सगळी धावपळ कथन केली.  

 डॉ. काशिद यांनी तात्काळ या रुग्णाला दवाखान्यात दाखल करून घेतले.  थोड्याच दिवसांत त्यांचा खुबा सांधेरोपण करण्यात आले. महिन्याभारत दुसऱ्याही खुब्यावर शस्रक्रिया यशस्वी झाली. विशेष म्हणजे, सर्वकाही महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीला देखील सामोरे जायला लागले नाही. 

दरम्यान, बोधले यांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार करणाऱ्या डॉ. काशिद यांचे अनोख्या प्रकारे आभार मानण्याचे ठरवले. त्यांना डॉ काशिद यांचा फोटो मिळत नव्हता; यानंतर त्यांनी सोशल मीडियात त्यांचे फोटो शोधले. फेसबुकवरून त्यांचा एक फोटो बोधले यांनी शोधून काढला. कुणालाही काहीही न सांगता या रुग्णाने डॉ काशिद यांचे चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. शस्रक्रीयेच्या चार पाच दिवसांनी जेव्हा डॉ काशिद या रुग्णाला भेटण्यासाठी आले, तेव्हा बोधले यांनी एका कागदावर डॉ काशिद यांचे पेन्सिलीच्या सहाय्याने रेखाटलेले एक चित्र त्यांना भेट दिले. हे चित्र हुबेहुब डॉ. काशिद यांचेच असल्याचे पाहून उपस्थित डॉक्टरांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

आपण कधी चालू शकू की नाही असा काही दिवसांपूर्वी प्रश्न पडलेल्या बोदडे यांना चालता येऊ लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यानंतर बोधले यांनी येथील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चित्र रेखाटून दिले.  एकूणच कोणत्याही दुर्धर आजारावर मात करता येणं शक्य आहे, ज्यावेळी डॉक्टरांसोबत आपल्या मनातील निस्वार्थी भावना बेमतलब काम करत असतात. त्यावेळी निष्ठेने केलेल्या कष्टाचे फळ हमखास मिळते, हे या घटनेवरून दिसून येते.

संबंधित रुग्णाचे वय कमी असल्याने रुग्णाला चालताना बघायचे होते. आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑपरेशनचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने दोन्ही ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. या रुग्णाने माझे व पत्नीचे जे हुबेहूब चित्र रेखाटले यामुळे खरच भारावलो. रुग्णांच्या प्रति डॉक्टरांचे असलेले कष्ट आणि डॉक्टरांच्या प्रति रुग्णांचे असलेले प्रेम यातून दिसते. रुग्णालयात अनेक रुग्ण येतात त्यांच्याकडून आपण केलेल्या उपचारांची दखल घेतली जाते. दोन गोड शब्द कानावर आले की केलेल्या कार्याचे चीज झाल्याचे अस्थिरोग तज्ञ डॉ. मनोज काशिद यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
Embed widget