नाशिक : आदिवासी जमातीत धनगर जातीचा (Dhangar Reservation) समावेश करू नये, आदिवासींच्या धनगरांना लागू केलेल्या सवलती बंद करा आदीसह इतर मागण्यासाठी आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आज नाशिकसह (Nashik) राज्यभर रास्ता रोको आंदोलन (Protest) केले. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरीजवळ घोटी टोलनाक्यावर मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील सर्व समाजबांधव एकत्रित आले असून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे आरक्षणप्रश्नी आदिवासी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


मराठा आंदोलन (Maratha Aarakshan) पेटल्यानंतर धनगर समाजानेही आंदोलनाचे हत्यार उपसत आदिवासी प्रवर्गातून (ST Reservation) आरक्षण देण्याची मागणी केली. या मागणीवरून नाशिक (Nashik) जिल्ह्यात आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र आदिवासींमधून आरक्षण देऊ नये, अशी मागणी होत आहे. त्यामुळे आदिवासी संघटनांच्या बैठका होत असून दोन दिवसांपूर्वी दिंडोरीसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात विराट मोर्चा (Morcha) काढण्यात आला. त्यानंतर आज आदिवासी संघटना, आदिवासी विकास परिषद आदींच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर शहर आणि घोटी येथील टोलनाक्याजवळ आदिवासी बांधवानी एकत्र येत उलगुलानच्या घोषणा देता सरकारवर धारेवर धरले आहे. 


दरम्यान आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव (Lucky Jadhav) म्हणाले की, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी धनगर व आदिवासी जमातीचा सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला आहे. तो शासनाने जाहीर करावा, पेसा कायद्याची छेडछाड करू नये, उलट पेसा कायदा कडक करावा, शिरपूर- सांगवी येथील दंगलीत 200 चे आसपास आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्यावे, कंत्राटी भरती रद्द करा, सटाणा येथील आंदोलनातील आदिवासींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच घोटी टोल नाका हद्दीत मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. या ठिकाणच्या अपघातात काही तरुणांना प्राण गमवावे लागले, संबंधित कुटुंबाना न्याय मिळावा, असा मागण्या या आंदोलनातून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 


सरकारला धडा शिकवण्याची गरज 


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाज संघटनांकडून या पार्श्वभूमीवर सातत्याने आंदोलने करण्यात येत असून आज राज्यभर रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून घोटी टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व आदिवासी बांधवांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आदिवासी भागात राज्यभर रास्ता रोको आंदोलन करावे ,असे आवाहन आदिवासी विकास परिषदेकडून करण्यात आले आहे. आदिवासींच्या विरोधात असणाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज आहे. सरकारकडून आदिवासी जमातीत धनगर जातीची घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत करण्यात येत आहे, यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले आले. त्यामुळे मराठा, धनगर आरक्षण नंतर आता आदिवासी समाज आरक्षणप्रश्नी पेटून उठला आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : 'धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देऊ नये', नाशिकच्या आदिवासी संघटनांकडून रास्तारोको आंदोलन