नाशिक : कपडे धुण्याच्या कॉस्टिक सोड्यापासून दूध तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार काहीच दिवसांपूर्वी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात समोर आला होता. ही घटना ताजी असतांनाच नाशिकच्याच (Nashik) निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात गाईच्या दुधात (Cow Milk) तेलसदृश्य पदार्थ, डेअरी परमीट पावडर आणि व्होल मिल्क पावडर मिसळत भेसळ केली जात असल्याचे अन्न औषध प्रशासन  (FDA) विभाग आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत समोर आलं आहे.


गेल्या काही दिवसात सातत्याने नाशिक (Nashik City) शहरसह जिल्ह्यातील बहुतांश भागात अन्नपदार्थात भेसळ (Food adulteration) होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. तरीदेखील वारंवार नाशिककरांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे प्रकार घडत आहेत. आता निफाड (Niphad) तालुक्यातील बोकडदरे शिवारात दुधात भेसळ होत असल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने संबंधित ठिकाणी छापा टाकून भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला आहे. डेअरी परमीट पावडर 18 किलो, व्होल मिल्क पावडर 34 किलो, तेलसदृश पदार्थ 170 लिटर व वरील पदार्थांची भेसळ (Parafin) करून बनविलेले 420 लिटर गाय दूधाचा साठा विक्रीसाठी तयार केल्याचे आढळून आले. 


अन्न व औषध प्रशासनाने निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात असलेल्या एका घरात हा छापा टाकला. आज सकाळी गाईच्या दुधात तेलसदृश्य पदार्थ, डेअरी परमीट पावडर आणि व्होल मिल्क पावडर मिसळत भेसळ केली जात असल्याच अन्न औषध प्रशासन विभाग आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत आढळून आलं आहे. 418 लीटर गाईच्या भेसळयुक्त दुधाचा साठा याठिकाणी जागीच नष्ट करण्यात येऊन 16 किलो डेअरी परमीट पावडर, 32 किलो व्होल मिल्क पावडर आणि 168 लिटर तेलसदृश्य पदार्थ प्रशासनाकडून हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, हा तेलसदृश्य पदार्थ घातक पॅराफिन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी दूध विक्रेता अतुल कातकाडे, दूध पावडर पुरवठादार हेमंत पवार आणि तेल सदृश पदार्थ पुरवठादार मोहन आरोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


48 हजार किमतीचा साठा जप्त 


अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकल्यानंतर एक व्यक्ती दूधाच्या प्लॅस्टिक कॅनमध्ये काही पदार्थ मिसळवत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी डेअरी परमीट पावडर 18 किलो, व्होल मिल्क पावडर 34 किलो, तेलसदृश पदार्थ 170 लिटर व वरील पदार्थांची भेसळ करून बनविलेले 420 लिटर गाय दूधाचा साठा विक्रीसाठी तयार केल्याचे आढळून आले. डेअरी परमीट पावडर 16 किलो किंमत 2240 रूपये, व्होल मिल्क पावडर 32 किलो किंमत 7680 रूपये, तेलसदृश पदार्थ 168 लिटर किंमत 25704 रूपये व भेसळयुक्त गाय दूध 418 लिटर किंमत रूपये 12540 असा एकूण 48164 रूपये किमतीचा साठा जप्त केला. सदर भेसळयुक्त गाय दुध हे भेसळयुक्त व नाशवंत असल्याने मानवी सेवनास येऊ नये, या उद्देशाने जागेवरच नष्ट करण्यात आला. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik : तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? कपडे धुण्याच्या सोड्यापासून बनवलं जातंय दूध, नाशिकमधील प्रकार