नाशिक : ज्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) काँग्रेसच्या (Congress) बाहेर पडले. त्यावेळेला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी उजवा हात म्हणून मी काम पाहिले. शरद पवार सांगतात की मी राष्ट्रवादी पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे, मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे कि, मी सुद्धा या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष आहे, आमचाही पक्ष बांधणीत खारीचा वाटा आहे, असे प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. याचवेळी कळवणला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्र्रवादी पक्षाच्या चिन्हांवरून वाद सुरु असून निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर थेट शरद पवार निवडणूक आयोगाकडे तहान मांडून होते. यावर छगन भुजबळ यांनी निशाणा साधला आहे. पवार साहेब म्हणाले होते की मी काही कोर्ट कचेरी करणार नाही. पण आता कालपासून बघतो आहे, स्वतः पवार साहेबच तिकडे इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये (Election Commission) गेले. ते सांगतात की राष्ट्रवादी (NCP Crisis) पक्षाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे, मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे कि, मी संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही? ज्यावेळी शरद पवार काँग्रेसच्या बाहेर पडले. त्यावेळेला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी उजवा हात म्हणून मी काम पाहिले, असेही भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावेळी त्यावेळच्या पक्ष चिन्हांबाबतची आठवण सांगताना म्हणाले की, किंबहुना माझ्याकडे विरोधी पक्ष नेत्याचा जो बंगला होता, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तिथे राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा कसा असेल हे ठरल, चिन्ह तिथेच ठरलं आणि तिथेच प्रतिज्ञापत्रे सादर केली. त्यावेळी आम्ही दोघांनी निवडणुकांचा प्रचार देखील याच चिन्हावर आणि झेंड्यावर केला. तुमचा वाटा खूप मोठा असेल पण आमचा सुद्धा खारीचा वाटा आहे की नाही. आम्ही देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत आलो आहोत. सत्तेत असो की नसो प्रत्येकवेळी काम करत गेलो. मग तुम्ही कस म्हणता कि काहीच केलं नाही. सगळं काही आहे, मग आम्ही का गेलो? याचं कारण जे आहे, वारंवार तुम्हाला सांगितलं. तुमच्याबरोबर जे लोक आहेत, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं. सगळ्याच्या सह्या प्रतीज्ञापत्रावर आहेत, आपल्याला सत्तेत जायचंय, आपल्याला विकासाची कामे करायची आहेत, म्हणून हा निर्णय झाल्याचे भुजबळ म्हणाले.
दादांना मुख्यमंत्री बनवायचं
आम्ही गेलो, मात्र आज आमच्यासोबत सर्वच आमदार आले आहेत. नागालँड, झारखंड येथील राज्यातील आमदारही आमच्यासोबत आहेत. सगळ्या आमदारासोबत दोन खासदार देखील आमच्याबरोबर आहेत. एका आमदाराबरोबर साधारण तीन लाख लोक असतात. मग एवढे आमदार असल्यावर न्यायाचा तराजू अजित दादासोबत झुकणार नाही का? आपण सगळे म्हणतात दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, यासाठी तुम्हाला आम्हाला काम करावे लागेल. आज असलेला 45 चा आकडा, 80 90 पर्यंत नेऊन ठेवला पाहिजे, त्यावेळी अजित दादा मुख्यमंत्री होतील. यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काम करावं लागेल, असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले.
इतर महत्वाची बातमी :