नाशिक : गेल्या काही दिवसांपासूनची नाराजी, अनेक बैठकांना अनुपस्थिती, त्यातच आज शेतकऱ्यांकडून ताफाही अडविण्यात आला. त्यामुळे आजचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्याच कळवणला (Kalwan) जाण्याआधी अजित दादांनी वणी गडावर जात सप्तशृंगी देवीचे दर्शन (Saptshrungi devi Darshan) घेतले आहे. त्यामुळे राज्यातील सुरु असलेल्या घडामोडींवर अजित दादांनी नेमकं सप्तशृंगी देवी चरणी काय साकडं घातले हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनानंतर ते कळवणला रवाना झाले आहेत. 


उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सप्तशृंगी देवीच्या चरणी


उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून सकाळी ओझर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र दिंडोरीहून वणीकडे जात असताना अचानक शेतकऱ्यांना अजित दादांचा (DyCM Ajit Pawar) ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी वणी गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या डोक्यावर टोपी, अंगावर पिवळी शाल, हाती सप्तशृंगी देवीचा फोटो होता. यावेळी सप्तशृंगी देवीची पूजा करत अजित दादांनी सप्तशृंगी देवीकडे काय मागितलं? अर्थात सध्या राजकीय वातावरण ज्या पद्धतीने तापलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर चिन्हांवरून सुनावणी सुरु आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री बदलाबाबतच्या चर्चाना उधाण आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्या घडामोडीतून महाराष्ट्राला शांती लाभू दे अशीच प्रार्थना अजित पवार यांनी केली असावी, अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. 


अजित दादांनी सप्तशृंगी देवीकडं काय मागितलं? 


एकीकडे राष्ट्रवादी पक्ष (NCP Crisis) आणि चिन्ह कुणाचं यावर राज्यभरात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून अजित दादा नाराज असायची चर्चा सुरु आहे. त्यातच नुकत्याच पालकमंत्री पदाच्या जाहीर झालेल्या यादीत अजित दादांना पुण्याचे पालकमंत्री पद सोपविण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा असा की, मुख्यमंत्री बदलबाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या गोटात नाराजी असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच अजित दादांनी मागील काही बैठकांना गैरहजेरी लावल्याचं बोललं जात आहे. अशातच आज त्यांनी नाशिक दौरा केला असून या सगळ्या घडामोडीवर आज काही बोलतील का? हे पाहणे महत्वाचं आहे. त्यातच दौरा सुरु असताना त्यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतलं आहे. यावेळी सप्तशृंगी देवीकडे काय साकडं घातलं? याचंही उत्तर ते देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, सुनील तटकरे, नरहरी झिरवाळ, नितीन पवार हे देखील सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. 


अजित पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न 


दरम्यान दौरा सुरु झाल्यानंतर दिंडोरीहुन कळवणकडे जात असताना अचानक शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्या ताफ्यासमोर कांदे टोमॅटो फेकून ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी ताफ्याच्या समोरच टोमॅटो कांदे फेकत अजित पवारांचे लक्ष वेधले. शिवाय शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत, मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कांदा निर्यात शुल्क मागे, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकऱ्यांनी जगायचं कस, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांनी धरपकड करत शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Ajit Pawar Nashik : कांद्याला हमीभाव नाही, टोमॅटोला दहा रुपये किलोचा भाव, जगायचं कसं? शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला!