नाशिक : नाशिक (Nashik) शहर व जिल्ह्यामध्ये मागील आठवड्याप्रमाणे मुसळधार पाऊस होण्याची (Heavy Rainfall) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज आणि उद्या रविवार रोजी कुलाबा येथील वेधशाळेने नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. यामुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नाशिक (Nashik Rain) जिल्ह्याला मागील महिन्यापासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम होती. मागील आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे शेती पिकांना (Nashik Crop Damages) जीवदान मिळाले होते, मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्याने परीस्थिती जैसे थे झाली आहे. धरणांची खालावलेली पाणी पातळी दोन दिवसांच्या पावसाने वाढली, मात्र पिकांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणामध्ये 90 टक्के इतका पाणीसाठा असून 23 20 धरणांची पातळी नव्वद टक्क्यांवर पोहचली आहे. यात पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत. आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट असून जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा असल्याने या दोन दिवस पाऊस पडावा अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), कळवण, निफाड, चांदवड, सुरगाणा (Surgana), पेठ आदि तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याचं दिसून येत आहे, तर येवला, सिन्नर या तालुक्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. दरम्यान जिल्ह्यात हवामान विभागांकडून शुक्रवारी यलो अलर्ट तर शनिवारी आणि रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देऊनही पावसाची पत्ताच नाही, त्यात आज उद्या ऑरेंज अलर्ट असल्याने पाऊस येईल, अशी आशा शेतकऱ्यांसह नागरिकांना आहे, मात्र सकाळपासून ढगाळ हवामान असून हलक्या सरींचा शिडकावा होत आहे.
जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट पण...
हवामान खात्याने या शुक्रवारी नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट' अर्थातच मध्यम पावसाचा इशारा दर्शविला होता. यानुसार शहरात दुपारी तीन वाजेनंतर हलक्या सरीचा वर्षाव काही भागात झाला. तर काही भागात पावसाचे वातावरण तयार झालं होतं अन ढग दाटून आले. मात्र शनिवारी देखील अशीच परिस्थिती असून आज ऑरेंज अलर्ट असूनही सकाळपासून अद्यापही पावसाचे आगमन झालेले नाही. आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने पावसाची प्रतीक्षा आहे. बंगालच्या उपसागरात मागील ४८ तासांत कमी दाबाचे तयार झालेले क्षेत्र ओडिशा, उत्तर आंध्र किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिमच्या दिशेने सरकले आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.
पुढील चार दिवस पाऊस कसा असेल?
दरम्यान नाशिक जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पुढील चार दिवस पाऊस कसा असेल याबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार 16 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट 17 सप्टेंबर रोजी देखील ऑरेंज अलर्ट या दोन दिवस घाटमात्यासह जिल्हाभरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर 18 आणि 19 सप्टेंबर ग्रीन अलर्ट देण्यात आल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी :