नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या बंदचा (Onion Issue) आज पाचवा दिवस असून आजही दिवसभर कांदा लिलाव ठप्प होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) कांदा बाजारपेठ आवारात उद्या बैठक होणार असून यानंतर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. 


एकीकडे बुधवारपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा व्यापारी संघटनाकडून बंद पुकारण्यात आला आहे. पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होऊनही तोडगा निघालेला नाही. त्याशिवाय व्यापारी संघटनांनी याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी एकत्र आले, मात्र यानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला दोन दिवस उलटुन गेले असून मंगळवारी पणनमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन आहे. मात्र दुसरीकडे या बंद दरम्यान लिलावच ठप्प (Nashik Onion Issue) असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर आता शेतकरी संघटना एकवटल्या असून उद्या लासलगावमध्ये महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. 


कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवणे, नाफेड (NAFED) व एनसीसीएफचा कांदा बंद करणे आणि नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवले आहे. याबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची उद्या सोमवार रोजी सकाळी 10 वाजता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार (Nashik Bajar samiti) समितीच्या कांदा मार्केटमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी शेतकऱ्यांची भूमिका काय असणार आहे, हे पाहावे लागणार आहे. कारण गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोटींची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.


व्यापारी वर्गाचा संप कायम  


नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कांदा प्रश्न चांगलाच पेटला असून शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. अशात पालकमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. बुधवारपासून जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांतील (Bajar Samiti) कांदा लिलाव बंद असून कांदा निर्यात शुल्क जोपर्यंत मागे घेतले जात नाही, तोपर्यंत लिलाव न करण्याची एकमुखी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाला नाही. तर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मागण्या मान्य झाल्या तर कांदा व्यापारी लिलावात सहभागी होतील, अन्यथा बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. एकीकडे व्यापा-यांनी संप पुकारलेला असतांना आता कांदा उत्पादक शेतक-यांची बैठक होत असून त्यात काय निर्णय होतो हे महत्त्वाचे आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : तोपर्यंत कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरूच राहील, नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी भूमिकेवर ठाम, आजही लिलाव बंदच