नाशिक : नाशिकच्या (Nashik) ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे (suhsma Andhare) यांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेल्या आरोपांवरून शिंदे गट आक्रमक झाला आहे. नाशिकमधील शिंदे गटाने रस्त्यावर उतरत सुषमा अंधारे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला जात आहे. सुषमा अंधारे यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत नाशिकमध्ये सुषमा अंधारे याना प्रवेश देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे यांचा संबंध ड्रग्ज माफियांशी जोडल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर दाद भुसे यांनी देखील अंधारेंनी आपला आरोप सिद्ध करावा, अन्यथा मालेगाव शहरवासीयांची माफी मागावी, असे प्रति आव्हान दिले. त्यानंतर नाशिकमधील शिंदे गटाने ठाकरे गटातील नेत्यांचे ललित पाटीलशी संबंध असल्याचे फोटो व्हायरल केले. त्यानंतर आता शिंदे गटाकडून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा संबंध ड्रग्स माफियांशी जोडल्यानं शिवसेना शिंदे गटाकडून सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला जात आहे. नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशेजारी हे आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्यासोबत ड्रग्स माफिया ललित पाटीलचे असणारे फोटो बॅनरवर झळकावले आहेत. 


दरम्यान सुषमा अंधारे यांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत नाशिकमध्ये सुषमा अंधारे याना प्रवेश देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 


 


Nashik News : ललित पाटीलसोबत ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो, नाशिकमध्ये शिंदे गटाकडून मंत्री दादा भुसे यांची पाठराखण