नाशिक : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) एकटा मराठा आरक्षण अडवू शकतो का? शरद पवारांना (Sharad Pawar विचारा, काँग्रेस नेत्यांना विचारा बाकीच्या मराठा नेत्यांना विचारा त्यांनी जर मंत्री मंडळातील नेत्यांना विचारा..सर्वांनी एकमत केले अन् आरक्षण दिले तर मी एकटा कसा विरोध करू शकतो, त्यामुळे सगळे मलाच असे कसे विचारू शकता 'मराठा आरक्षण 'देता येईल का? असा सवाल पुन्हा एकदा छगन भुजबळ (Chhhagan Bhujbal) यांनी उपस्थित केला आहे.  


गेल्या काही दिवसांपासून  मराठा आरक्षणावरून (Maratha Aarakshan) चांगलाच वाद पेटला आहे. यात तब्बल सतरा दिवस उपोषणाला बसलेले, तसेच अख्खं मंत्री मंडळ हलवून सोडणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही मिटण्याची चिन्हे नाही. अगदी उपोषण सुटल्यापासून ते आजपर्यंत सातत्याने दोघांमध्ये प्रश्न उत्तरांचा तास सुरु आहे. कालच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या अंतरावली सराटी येथील सभेसाठी शंभर एकरांवर तयारी करण्यात आली आहे. यासाठी सहा सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे, भुजबळ म्हणाले . यावर मनोज जरांगे यांनी उत्तर देत भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, “सात कोटी जमा केल्याचे त्यांना कोणी सांगितले. त्याला (भुजबळ) पाहिजे का दोन एक हजार डीझेल टाकायला, असे सणसणीत उत्तर जरांगे यांनी दिल आहे. यावर आज पुन्हा भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


छगन भुजबळ म्हणाले की, भुजबळ एकटा मराठा आरक्षण (Maratha Reservation) अडवू शकतो का? शरद पवारांना विचारा, काँग्रेस नेत्यांना विचारा, बाकीच्या मराठा नेत्यांना विचारा त्यांनी जर मंत्री मंडळातील नेत्यांना विचारा..सर्वांनी एकमत केले अन् आरक्षण दिले तर मी एकटा कसा विरोध करू शकतो, त्यामुळे सगळे मलाच असे कसे विचारू शकता 'मराठा आरक्षण 'देता येईल का? जरांगे पाटील मलाच कसे बोलू शकतात, इतरांना पण त्यांनी विचारले पाहिजे, असे मंत्री छगन भुजबळांनी नाशिकच्या (Nashik) येवल्यात स्पष्ट केले. आरक्षणाठी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील भुजबळांनाच का टार्गेट करतात? असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता मंत्री छगन भुजबळ बोलत होते. त्यामुळे सातत्याने दोन्ही पक्षाकडून उत्तर प्रतिउत्तर देण्याचे काम सुरु आहे. यामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 


सात कोटींचा वाद काय झाला? 


समता परिषदेच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावेळी बोलतांना भुजबळ म्हटले की, 100 एकरात शेती साफ करुन मैदान करताय, 7 कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यांच्या याच टीकेला मनोज जरांगे यांनी देखील उत्तर दिले आहे. भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, “सात कोटी जमा केल्याचे त्यांना कोणी सांगितले. त्याला (भुजबळ) पाहिजे का दोन एक हजार डीझेल टाकायला. भुजबळ आता काहीही बोलयला लागले आहे. त्यांना काही झालं आहे का? सरकारने त्यांना लवकर रुग्णालयात नेले पाहिजे. एवढा मोठा माणूस असे काहीही कसा बोलू शकतो. मी केलेल्या एवढ्या दौऱ्यात एकही मराठा म्हणाला मी 50 रुपये घेतले, तर तो म्हणेल ते करायला मी तयार आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


भुजबळ म्हणाले 7 कोटी आले कुठून, जरांगे म्हणतात, डिझेलला दोन-एक हजार रुपये देऊ का? मराठा-OBC वाद पेटणार?