Vijaykumar Gavit : इगतपुरीची (Igatpuri) घटना भीषण असून संबधित पिडीत मुलांना प्रत्येक तीस हजारांची मदत देत आहोत, तसेच केंद्र सरकारकडून (Central Government) संबधित विद्यार्थ्यांना मदत मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. संबधित वस्तीवरील व इतर राज्यातील इतर बेघर मुलांचा तातडीने सर्वे करून जवळच्या आश्रम शाळांत (Ashram school) दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरु करणार आहोत, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील आदिवासी बालिका मृत्यू प्रकरणासह जिल्ह्यातील आदिवासींच्या प्रश्नांसंदर्भातील आढावा घेण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असताना बोलत होते. डॉ. विजयकुमार गावित हे तीन दिवशीय नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांनी इगतपुरी येथील उभाडे वस्तीला भेट देत मुलांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले कि, पुढील कालावधीत अशा पद्धतीने राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाना घरे देण्यात येतील, सर्वांना एका ठिकाणी कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, राज्यातील अनेक आदिवासी बांधव रोजगारासाठी स्थलांतर करतात. किंवा इकडे तिकडे व्यवसायासाठी जातात, ते जावं लागणार नाही. त्यांना राहत्या ठिकाणी काही छोटे मोठे व्यवसाय उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येतील. तसेच शासनाचे योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणर आहोत. तसेच महत्वाचे म्हणजे राज्यातील सर्वच आदिवासी कुटुंबियांचे सर्वेक्षण कारणे सुरु आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आधार कार्ड, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड, जातीचे दाखले आणि इतर दाखले पुरविण्यात येतील. या दोन-तीन महिन्यात कुठल्याही परिस्थितीत शंभर टक्के देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून आज त्यांची जी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये निश्चितपणे सुधारणा होईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
तसेच बेघर असणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून सर्वाना आश्रम शाळेमध्ये व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर आई वडिलांना पण रोजगार आम्ही दिला जाईल. राज्यभरात ट्रायबल रिसर्च सेंटर च्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु आहे. पुढील एक दोन वर्षात सर्वेक्षण झाल्यानंतर सर्वाचे पुनर्वसन करण्यात येईल. नगर जिल्ह्यात जिल्ह्यातून त्यांना आपण प्रत्येकी 30 हजार रुपयाची मदत देतो आहे आणिइगतपुरीची घटना भीषण असून संबधित पिडीत मुलांना प्रत्येक तीस हजारांची मदत देत आहोत, तसेच केंद्र सरकारकडून संबधित विद्यार्थ्यांना मदत मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.
दोन दिवस भरगच्च कार्यक्रम
दरम्यान मंत्री विजयकुमार गावित हे नाशिक तीन दिवसीय दौऱ्यावर आले असून उद्या ते विविध संघटना आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. अकरा वाजता महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ संचालक मंडळाची ते बैठक घेणार आहेत. शुक्रवारी रात्री देखील त्यांचा मुक्काम नाशिकमध्ये असणार आहे . शनिवारी आठ वाजता कळवण येथे आदिवासी मुलींचे वस्तीगृह व मॉडेल स्कूलचे भूमिपूजन दुपारी सव्वा बारा वाजता सटाणे येथे आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाचे उद्घाटन होणार आहे.