नाशिक : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दोन दिवस पावसाने समाधानकारक हजेरी (Rain) लावली. मात्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण पहायला मिळाले. पुढील पाच दिवस नाशिक जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अंदाज वर्तविला असून त्यानुसार 26 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आलं असून 27 आणि 28 सप्टेंबर रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटी का होईना पावसाच्या आगमनाची नाशिककरांना प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली, त्यानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत पाऊस होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली असून आज सकाळपासून ढगाळ हवामान अनुभवायास मिळत आहे. मात्र अधून मधून हलक्या सरी कोसळत असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने गंगापूर धरण साठ्यात वाढ होत असल्याने विसर्ग सुरूच आहे. पुढील पाच दिवस पाऊस असणार असून यात दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे तर दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain Update) दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 


#नाशिक जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस हवामान विभागाने अंदाज वर्तविला असून त्यानुसार २६ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलं असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

file:///C:/Users/admin/Downloads/7.district.pdf@WeAreNashik @InfoNashik @Hosalikar_KS #Nashik pic.twitter.com/WNlWCtqS1T


— PAWAR GOKUL (@TheJournalistDD) September 24, 2023


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही नाशिक जिल्ह्यात (Nashik Dsitrict Rain) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार शहरात ढगाळ वातावरण असून अद्याप दिवसभरात चांगला पाऊस झालेला नाही, मात्र जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला असून यात सटाणा बागलाण परिसरात 19 मिमी, येवला 35 मिमी, नांदगाव 27 मिमी, चांदवड 10 मिमी, दिंडोरी 11 मिमी, सिन्नर 1.3 मिमी, देवळा 7.4, पेठ 17 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर काही भागात पाऊस सुरु असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांतून विसर्ग सुरु आहे. यात दारणा धरणातून 2708 क्युसेक, गंगापूर धरणातून 4544 क्युसेक, आळंदी 87 क्युसेक, कडवा 824 क्युसेक, वालदेवी 25 क्युसेक, तर नांदूरमधमेश्वर धरणातून आज 3 वाजता 7117 क्यूसेक्स होता. त्यानंतर 4 वाजता 3155 क्यूसेकने वाढवून एकूण 10272 क्यूसेक करण्यात आला आहे. तर गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे गंगापूर धरणातून आज सकाळी 10 वाजता 3408 क्युसेकने सोडण्यात आला होता, तो आज दुपारी 4 वाजता 1136 क्युसेकने वाढवून एकूण 4544 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील होळकर पुलाखालून 4881 क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात प्रवाहित होत आहे.


पुढील पाच दिवस अंदाज काय? 


दरम्यान दोन दिवस पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर आज सकाळपासुन उघडीप दिली आहे. ढगाळ वातावरण असूनही दमदार पाऊस नाही. हवामान विभागानुसार पुढील पाच दिवस नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात आज २४ सप्टेंबर रोजी पासून 26 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट तर 27आणि 28  सप्टेंबर रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस पावसासाठी आशादायक चित्र असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : गंगापूर धरणातून  3408 क्युसेकने विसर्ग; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, नाशिकसह जिल्ह्यात पावसाची पुन्हा विश्रांती