नाशिक : नाशिक (Nashik) शहरात आज सायंकाळी पावसाने (Nashik Rain) जोरदार हजेरी लावली असून विजांच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले. गणपती आगमनापासून पावसाने दडी मारली होती, अखेर गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी आणि गौराईच्या (Ganesh Chaturthi) आगमनासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिककरांसह (Nashik Ganeshotsav) शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


नाशिकसह जिल्ह्यात (Nashik Rain Update) आजही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. कारण यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालेला आहे. गणेश आगमनाच्या (Ganeshotsav) आदल्या दिवशी पावसाने काहीसा शिडकावा केला होता, त्यानंतर आज सायंकाळी साडे पाच वाजेपासून पावसाळा सुरवात झाली आहे. सुरवातीला ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरु होता. त्यानंतर लागलीच पावसाने धुवांधार बॅटिंग (Heavy Rain)  करण्यास सुरवात केली असून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, सुग्रण, पेठ, इगतपुरी, येवला, निफाड आदी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांसह जिल्हावासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय पावसाने बळीराजाला (Nashik Farmers) चांगलाच दिलासा दिला असून जाण्याच्या स्थितीत असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने आज सायंकाळी जोरदार पुनरागमन केले. एकीकडे शहरात गणेशोत्सवाचा माहोल असताना सायंकाळी नाशिककर गणेश देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले असताना अचानक सायंकाळी पावसाने हाजरी लावून सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. नाशिक शहरातील बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक भागातील बत्तीही गुल झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच अनेक उंचसखल भागात पावसाचे पाणी साचल्याने घरी जाणार्यांना चांगलीच कसरत करावी लागली. त्याचबरोबर गणपतीचे आगमन झाल्याने पाऊस झाललेला नव्हता, शिवाय कालच गौराई देखील घरोघरी स्थापन झाल्या, त्यानंतर आज पावसाने हजेरी लावल्याने सर्वच जण सुखावले आहेत. 


जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता 


नाशिक शहरासह जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, निफाड तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पाण्याअभावी मान टाकू लागलेल्या पिकांनाही या पावसामुळे जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मान्सून सुरू होऊन जवळपास तीन महिन्याहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही नाशिक जिल्ह्यावर पावसाची अवकृपा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग वाहत आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असाच दमदार पाऊस पुढील काही दिवस बरसावा अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत. हवामान विभागाने उद्याचा दिवस यलो अलर्ट दिला असून उद्याही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील 213 गावांना सर्वाधिक 81 टँकरद्वारे पाणीपुरवठा, भर पावसाळ्यात टँकरवर तहान भागवण्याची वेळ