नाशिक : 'नाफेडमार्फत (NAFED) आज कांद्याला प्रतिक्विंटल 2410 रुपये भाव मिळाला, मात्र हा दर परवडणारा नाही, तीन ते साडे तीन हजार रुपये भाव हवा होता, मात्र कांदा चाळीत सडण्यापेक्षा इथं आणून विकलेला बरा', अशी प्रतिक्रिया नाशिकच्या एका शेतकऱ्याने दिली. केंद्र सरकारने घोषणा करताच नाशिकच्या (Nashik) पिंपळगावमधील नाफेड केंद्रावर कांदा खरेदीला (Onion Sale) सुरुवात झाली आहे. 


केंद्र सरकारने घोषणा करताच नाशिकच्या पिंपळगावमधील (Pimpalgaon) नाफेड केंद्रावर कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे. शनिवारी केंद्राने कांद्यावरती 40 टक्के निर्यात शुल्क आकारल्यानंतरशेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना होती. अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. आजही अनेक भागात आंदोलने झाली. त्यानंतर आज महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी दिल्लीत जाऊन वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत चर्चा केली. नाशिकच्या केंद्रीय राज्यपाल यांनी देखील पत्र व्यवहार केला होता. त्यानंतर पियुष गोयल यांनी घोषणा करत आजपासून नाफेडच्या माध्यमातून पुन्हा एकदा कांदा खरेदी करण्यात येईल. त्यासाठी महाराष्ट्रात दोन ठिकाणी कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. 


नाशिकमधील पिंपळगाव बाजार समिती (Pimpalgaon Bajar Samiti) परिसरात नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून कांदा खरेदीला सुरवात झाली आहे. तसेच २४१० रुपये प्रतिक्विंटल कांदा दराने खरेदी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कांदा विक्रीसाठी अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर दाखल होत असून कांदा विक्री केली जात आहे. यावेळी परिसरातील लोखंडेवाडी येथून आलेले शेतकरी हरिभाऊ किसन गायकवाड म्हणाले की, शेतकऱ्याला वाढलंय तरी परवडतय अन कमी झालंय तरी परवडतय, असंच म्हणावं लागेल. तर उत्पादन खर्च आणि आजचा मिळालेला भाव यावर आपली मागणी काय? शेतकरी म्हणले की भाव तर वाढलाच पाहिजे, तसेच निर्यात शुल्क वाढविले आहे, ते बंद झाले पाहिजे. याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. नाफेडने खरेदी सुरू केली आहे, ही महत्त्वाची असून काहीअंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे देखील शेतकरी म्हणाले. मात्र एक शेतकरी म्हणाले की, 2410 रुपये भाव मिळाला, मात्र हा दर परवडणारा नाही, तीन ते साडे तीन हजार रुपये भाव हवा होता, मात्र कांदा चाळीत सडण्यापेक्षा इथं आणून विकलेला बरा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे एकूणच सरकारने सद्यस्थितीत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचं दिसून येत आहे.


कांदा खरेदी केंद्र सुरु 


महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीस केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानुसार आजपासून लागलीच नाशिकसह अहमदनगर येथील नाफेडमार्फत कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Onion : आजपासूनच कांदा खरेदीला सुरुवात, आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी करणार : पियूष गोयल