नाशिक : नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणी सातत्याने नवी माहिती समोर येत असून काही दिवसांपूर्वी देवळा तालुक्यातील गिरणा नदीत मुंबई पोलिसांकडून शोध मोहीम करण्यात आली होती. यावेळी पाणी जास्त असल्याने ड्रग्स सापडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आले होते. आता पुन्हा एकदा ड्रग्सच्या शोधासाठी गिरणा नदीवरील साठवण बंधाऱ्यातील पाणी सोडून शोध घेतला जाणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाशी संपर्क साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


नाशिक ड्रग्ज प्रकरणात नाशिक पोलिसांसह मुंबई पोलीस, पुणे पोलीस सातत्याने नवनवी माहिती समोर आणत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावादरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गिरणा नदी गाठत तब्बल 10 ते बारा तास शोधमोहीम केली होती. अगदी कॅमेर्यांच्या माध्यमातून हे सर्च ऑपरेशन सुरु होते. मात्र त्यावेळी नदीत पाणी जास्त असल्याने ड्रग्ज शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली होती. आता पुन्हा मुंबई पोलिसांची टिम गिरणा नदीवर पोहचली असून नव्याने शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. 


ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिक कारखानामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतून गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. त्याचबरोबर हा गिरणा नदीजवळील सरस्वती वाडीच्या आसपास 15 किलो ड्रग्स लपून ठेवल्याचे देखील समोर आले होते, ते पोलिसांनी हस्तगत केले होते. मात्र नदीपात्रात  फेकून दिलेले ड्रग्ज काही केल्या सापडले नव्हते. यासाठी नदीपात्रात कॅमेरे सोडण्यात आले होते, मात्र तरीदेखील काहीही हाती आले नव्हते. पाणी जास्त असल्याने शोधण्यात अडथळे येत होते. अखेर सकाळपर्यंत चाललेली शोधमोहीम थांबविण्यात आली होती. आज पुन्हा गिरणा नदीत फेकलेले ड्रग्स शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. आता ड्रग्सच्या शोधासाठी गिरणा नदीवरील साठवण बंधाऱ्यातील पाणी सोडून ड्रग्स चा शोध घेतला जाणार आहे. यासाठी मुंबई पोलीस आणि जलसंपदा विभाग यांच्यात पाणी सोडण्या बाबत पत्रव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. 



ललित पाटीलची पोलीस कोठडी उद्या संपणार 


ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिक कारखानामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतून गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. सचिन वाघच्या तपासात ही माहिती उघडकीस आल्यानंतर मुबंई पोलीस सचिन वाघसह नाशिकमध्ये दाखल झाले होते. मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रात रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगच्य पथकाच्या शोध मोहीम सुरू होती. सुमारे 50 किलो ड्रग्जच्या दोन गोण्या नदी पात्रात फेकल्याच सचिन वाघने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांकडून कॅमेराच्या माध्यमातून ड्रग्जचा शोध घेण्यात आला, मात्र पाणी साधारण 15 ते 20 फूट खोल असल्यानं मोहीम थांबवली होती. त्याचबरोबर उद्या ललित पाटीलची पोलीस कोठडी संपणार असल्याने पोलिसांकडून तपासात गती देण्यासाठी ड्रग्सचा शोध घेतला जात आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Drug Case : 'गिरणा नदी चर्चेत, असंख्य गावांना पाणी पुरवठा ते सुसाइड पॉईंट आणि आता नाशिकच्या ड्रग्ज रॅकेटशी कनेक्शन'!