Onion News : केंद्र सरकारनं (central govt) महाराष्ट्रात दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नाशिक (Nashik) जिल्हाधिकारी यांनी नाफेडला (Nafed) मार्केटमध्ये कांदा खरेदी आदेश दिले आहेत. मात्र, असे असले तरी अद्याप नाफेडचे प्रतिनिधी मार्केटमध्ये आले नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केले. जिथं जखम झाली, तिथंच मलमपट्टी करा असे म्हणत जगताप यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 


नेमकं काय म्हणाले संदीप जगताप?


नाफेडला कांदा खरेदी करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मात्र, कोणत्याही बाजार समितीत अद्याप नाफेडचे प्रतिनिधी उपस्थित नाहीत. त्यामुळं सरकारचा कांदा खरेदीचा आदेश कितपत प्रत्यक्षात उतरेल ते माहीत नाही, असे जगताप म्हणाले. दरम्यान, कांदा खरेदी केल्यानंतर फार्मर्स कंपन्याना नाफेड 15 दिवसांनी पैसे देते. त्यामुळं आता असा प्रश्न निर्माण होतो की, किती फार्मस कंपन्यांची अर्थिक स्थिती चांगली आहे की, त्या कंपन्या सलग 15 दिवस शेतकऱ्यांना रोख पैसे देतील. त्यामुळं सरकारचा हा निर्णय प्रत्यक्षात उतरणं कठीण असल्याचे जगताप म्हणाले. त्यामुळं जिथं जखम झाली तिथंच मलमपट्टी करा असे जगताप म्हणाले.


...तर कांद्याचे दर 40 ते 50 रुपये राहतील


सद्या कांद्याच्या दरात घसरण होत आहे. कांद्याचे दर वाढवायचे असतील तर केंद्र सरकारनं कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारल्याचा निर्णय मागे घेणं गरजेचं आहे. जर सरकारनं निर्यात शुल्क आकरण्याचा निर्णय मागे घेतला तर कांद्याचे दर 40 ते 50 रुपये राहतील असे संदीप जगताप म्हणाले.


50 रुपये किलोनं कांद्याची खरेदी करा


सरकार 2 हजार 410 रुपये भावाने नाफेडतर्फे कांदा खरेदी करणार आहे. हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे जगताप म्हणाले. जेव्हा कांदा तीन ते दहा रुपये किलोने विकत होता. तेव्हा सरकार झोपले होते का? केंद्राने तेंव्हा या भावाने कांदा खरेदी करायला हवा होता असे जगताप म्हणाले. आज कांदा निर्यात शुल्क लावले नसते तर 40 ते 50 रुपये किलोने कांदा विकला असता. मात्र केंद्र सरकार 24 रुपयांनी कांदा खरेदी करत आहे. म्हणजे मिळणाऱ्या बाजार भावाच्या अर्ध्याच किमतीत ही खरेदी असल्याचे जगताप म्हणाले. शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचीच सरकारची ही नीती आहे. तुम्हाला खरेदीच करायचा असेल कांदा तर तो पन्नास रुपये किलोने खरेदी करा असे जगताप म्हणाले.


इतर संबंधित बातमी : 


Sharad Pawar On Sugar Export Ban : केंद्र सरकारनं जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली तर....वाचा शरद पवार नेमकं काय म्हणाले?