नाशिक : मराठा समाजाचे (Maratha Andolan) आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत असून राज्यातील अनेक पक्षाची कार्यालये फोडण्यात आली आहे. अशातच येवल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लावलेले मंत्री छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) फोटो काढण्यात आले आणि या फोटोंची तोडफोड करण्यात आली असून या फोटोंवर शाईफेक करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


आज मंगळवार रोजी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून दुसरीकडे मराठा आंदोलन (Maratha Reservation) चांगलंच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यातील आंदोलनाची धग कायम असून जाळपोळीसह गाड्यांची तोडफोड करण्यात येत आहे. तर इकडे पुणे, नाशिकमध्ये (Nashik) देखील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज दुपारी आमदार सीमा हिरे (Sima Hiray) यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. तर मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघांमध्ये देखील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. आता काही वेळापूर्वी येवला (Yeola) कृषी उत्पन्न बाजार समितीतील छगन भुजबळ यांच्या फोटोंची तोडफोड करण्यात आली असून शाई फेकून निषेध करण्यात आला आहे.


मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) मागणीवरून राज्यभरात आंदोलन होत असून नाशिक जिल्ह्यात येवल्यात देखील त्याचे पडसाद उमटताना दिसून येत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात मराठा समाज आक्रमक झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांचे फोटो काधनून टाकण्यात आले असून त्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या फोटोंवर शाई फेकून भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच पंचायत समिती, जगदंबा माता देवस्थान कोटमगाव, अंदरसुल ग्रामपंचायत तसेच अधिक विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील मंत्री छगन भुजबळ यांच्या लावलेल्या प्रतिमा काढून त्यावर शाही फेकून निषेध करण्यात आला आहे. 


भुजबळ संपर्क कार्यालयावर पोलीस बंदोबस्त...


मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मराठा आंदोलन हे ठीक ठिकाणी आक्रमक होत असून मराठवाडा भागात लोकप्रतिनिधींचे घर व कार्यालय लक्ष करण्यात आले. बीड येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरांवर आंदोलकांनी दगडफेक करत जाळपोळ केल्याची घटना घडल्याने खबरदारी म्हणून मुंबई व नाशिक येथील मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर भुजबळांच्या येवला मतदारसंघातील संपर्क कार्यालयावर देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील भुजबळ फार्मवर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


मराठ्यांना जिंकायचं आहे पण ते तुमच्या सोबतच! शिवव्याख्यात्याचं मनोज जरांगेंना अंगावर काटा आणणारे पत्र