नाशिक : एकीकडे राज्यभर मराठा आंदोलनाचे लोण पसरले असून आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे देखील पाहायला मिळाले. तर नाशिकमध्ये देखील मराठा समाज रस्त्यावर उतरला असून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. आज नाशिक तालुका परिसरातील गावांनी एकत्र येत पुन्हा एकदा भव्य पायी मूक मोर्चा काढण्यात आला. नाशिक-पुणे मार्गावरील शिंदे गावापासून ते नाशिकरोडपर्यंत असा अकरा किलोमीटरचा हा भव्य मोर्चा काढण्यात आला.
मराठा आरक्षण मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम असून शासनाने लवकरात लवकर आरक्षण निर्णय घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. दुसरीकडे राज्यात असंतोष असून अनेक ठिकाणी बसेसची तोडफोड, राजकीय नेत्यांच्या कार्यालयांच्या तोडफोड, जाळपोळ केली जात आहे. त्यामुळे आता मराठा समाज रस्त्यावर येत आंदोलने केली जात आहेत. नाशिकमध्ये देखील सकल मराठा समाज बांधवाच्या माध्यमातून भव्य मोर्चा काढण्यात आला. शिंदे, पळसेसह आजुबाजुंच्या विविध गावातील ग्रामस्थांचा हा मोर्चा असून या मोर्चाला मराठा बांधवांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. जवळपास शिंदे गावापासून ते नाशिकरोड पर्यंत असा अकरा किलोमीटरचा मोर्चा पायी मूक मोर्चा काढण्यात आला होता.
शिंदे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या भव्य पायी मूक मोर्चाला सुरवात झाली. त्यानंतर पळसेमार्गे चेहेडी, सिन्नर फाटा नाशिकरोड पर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात हजारो समाज बांधव एकवटल्याचे पाहायला मिळाले. त्यात मोहगाव, शिंदे, पळसे, बाभळेश्वर, चेहेडी, जाखोरी, चांदगीरी कोटमगाव, सामनगाव, नानेगाव, शेवगेदारणा, वडगाव आदी गावांसह परिसरातील मराठा बांधवानी या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा समाजाला हक्काचा आणि कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळावं तसेच मराठा बांधवांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे यासाठी भव्य पायी मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी नाशिकरोड या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर याच ठिकाणी एकूण तीन उपोषण सुरु असून यातील एका ठिकाणी एक महिला आपल्या सात महिन्याच्या बाळासह उपोषणासाठी बसलेली असल्याचे पाहायला मिळत आहे.
कॅण्डल मार्च, मशाल मोर्चानंतर भव्य पायी मूक मोर्चा
सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी मोर्चाचे आयोजन केलं जात आहे. काल कराडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक मोठा मोर्चा काढला गेला होता. काल नाशिक शहरांमध्ये कॅण्डल मार्च, मशाल मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यानंतर आज ग्रामीण भागातील समाज बांधवानी एकत्र येत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. अनेक गावातले आंदोलक या मोर्चा स्थळी एकवटलेले पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यातल्या विविध भागांमध्ये मोठमोठे मोर्चे काढले जातात. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चाचं सहभागी झाल्याचे दिसून आले.
इतर महत्वाची बातमी :
मनोज जरांगेंनी शाहू महाराजांचा मान राखला, महाराज म्हणाले, सरकारला तुमचा शब्द मानावाच लागेल!