नाशिक : नाशिकच्या (Nashik) गंगापूर आणि दारणा धरणांमधून जायकवाडी (Jayakwadi) जलाशयात पाणी सोडण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला. मात्र या आदेशास स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध होत असून त्यामुळे नाशिक नगर आणि मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटणार असण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊसमान कमी असल्याने आगामी पावसाळा (Rainy Season) येईपर्यंत नाशिककरांना दुष्काळाची झळ सोसावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत नाशिकच्या लोकप्रतिनिधींकडून विरोध दर्शवला जात आहे.  


यंदा राज्यभरात पाऊस (Maharashtra Rain) कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. नुकताच राज्य सरकारने देखील दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली असून यात नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यात पाऊस खूपच कमी पडला असल्याने अशातच जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील धरणांमधून सुमारे 8.7 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.


यात नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या (Nashik) गंगापूर धरणातून (Gangapur Dam) 0.5 टीएमसी म्हणजेच पाचशे दशलक्ष घनफूट, तर दारणा धरण समूहातून 2 हजार 643 टीएमसी याप्रमाणे प्रमाणे पाणी सोडावे लागणार आहे. मात्र जेव्हा पाणी सोडण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला, त्या दिवसांपासून शेतकऱ्यांचा पाणी सोडण्यास तीव्र विरोध सुरु आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील विरोध केला असून आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेतून नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा पाढा वाचला. तसेच शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. 


यंदा नाशिकसह विभागातील अहमदनगर जिल्ह्यातील सरासरीपेक्षा अवघा 52 टक्के पाऊस झाला असून आताही जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये पाणीटंचाई सुरु आहे. अनेक तालुक्यात टँकरद्वारे आजही पाणीपुरवठा केला जात आहे. अशा स्थिती आगामी पाऊस येईपर्यंत जिल्ह्यातील धरणांमधील साठा टिकवणे गरजेचे आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीसाठी 8.603टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. यावर आमदार देवयानी फरांदे यांनी रोष व्यक्त करत पाणी सोडण्यास विरोध केला आहे. यंदाच्या वर्षी विशेष बाब म्हणून जायकवाडीच्या मृत साठ्यातून जायकवाडी जलाशयात 65 टक्के उपयुक्त पाणीसाठा होण्यासाठी 5.94 टीएमसी पाणीसाठा वापरण्यास शासनाने परवागी द्यावी, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे.


ग्रामीण भागात 144 कलम लागू


दरम्यान जायकवाडीसाठी गंगापूर व दारणा धरणसमूहातील पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा रोष उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण भागात 144 कलम लागू करण्यात आले आहे. नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यास स्थानिकांचा विरोध असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गंगापूर, दारणा, मुकणे, कश्यपी तसेच नांदुरमध्यमेश्वर धरणाच्या परिसरात लोकांची गर्दी वाढू नये, यासाठी नदीकाठच्या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हा आदेश 06 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik : नाशिकच्या गंगापूर-दारणा समूहातून जायकवाडीसाठी पाणी सोडणार; शेतकऱ्यांचा विरोध, पाणी संघर्ष पेटणार?