नाशिक : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा दिवसेंदिवस चिघळत असून राज्यभरात आंदोलन (Andolan) करण्यात येत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. नाशिकमध्ये (Nashik) देखील सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सण हा न साजरा करण्याचा निर्णय सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने घेण्यात आला आहे. 


नाशिकच्या (Nashik District) शिवतीर्थावर सुरू असलेल्या मराठा मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत विविध क्षेत्रातील, समुदायातील मंडळी उपस्थित होती. यावेळी सर्वाभिमुख ठराव घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने मराठा समाजाचा आधारस्तंभ मनोज जरांगे पाटील (manoj jarange) यांची प्रकृती बघता व मराठा समाज शिक्षण आणि रोजगारातील आरक्षणासाठी झगडत असतांना नाशिक शहर व जिल्ह्यात एक ही घरात दिवाळी साजरा होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.


त्याचबरोबर मराठा समाजातील युवकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. तसेच राज्यात सुरु असलेल्या कुठल्याही हिंसक आंदोलनास सकल मराठा समाजाचे (Maratha Aarkashan) समर्थन नाही. मंत्री, आमदार, खासदार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, संसद, विधिमंडळात आवाज उठवावा, असे आवाहन मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे. 


गेल्या 50 दिवसापासून नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. पूर्णवेळ उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणात बसले आहेत. याच ठिकाणी मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलाच पाहिजे. मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे झगडता आहेत. 


दुसरीकडे मराठा समाजातील नेते मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नेत्यांनो याद राखा, आम्ही तुमचे सत्तास्थान हलवू, असा इशारा बैठकीतून देण्यात आला आहे. मराठा तरुणांच्या वाढत्या आत्महत्या व मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती याकडे शासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर आरक्षण द्यावे, मराठा समाजाचा अंत पाहू नका, असेही सांगण्यात आले आहे. मराठा समाजासाठी जीवाचे रान करणारे मनोज जरांगे पाटील, यांच्या सूचनेनुसार यापुढे आंदोलन भूमिका राहील, असेही सांगण्यात आले. 


बडी दर्गा येथे दुवा पठण


मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलने करण्यात येत असून मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि आता पुण्यातही आंदोलनचे लोण पसरले आहे. नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) आंदोलन सुरु असून ठिकठिकाणी रास्ता रोको, निषेध मोर्चे, कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश मुस्लिम समूदायाकडून देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला आहे.. त्याचबरोबर अनेक पक्षांकडून देखील पाठिंबा दर्शवला जात आहे. नाशिक शहर काँग्रेसने देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नाशिक शहरातील बडी दर्गा येथे जात दुवा पठण करण्यात आली. त्याचबरोबर दर्ग्यावर चादरही चढविण्यात आली. 



इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : मनोज जरांगे यांना पाठींब्यासाठी बडी दर्ग्यावर चढवली चादर, नाशिकमधील सर्वधर्मीय समाज बांधवांकडून दुआ पठण