नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील नामांकित बिल्डर कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा (Naresh Karda) यांच्याविरोधात 1 कोटी 20 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 3 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एकीकडे नाशिक जिल्ह्यात मोठं मोठ्या बांधकाम कंपन्या असून नाशिकसह पुणे, मुंबईकडून (Mumbai) नागरिक नाशिकला स्थायिक होत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये दिवसेंदिवस इमारतींची संख्या वाढत आहे. अशातच नरेश कारडा यांच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एक कोटी वीस लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. व्यावसायिक राहुल जयप्रकाश लोनावत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अशोका मार्गवरील कारडा कंट्रक्शनच्या गृहनिर्माण प्रकल्प कार्यालयात प्रकल्प विकास कामांसाठी एक कोटी वीस लाख रुपये घेतले होते.
दरम्यान यानंतर अनेक दिवस उलटूनही ते बांधकाम पूर्ण झाले नाही, तसेच रक्कम देखील लोनावत यांना परत केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी लोनावत यांनी आठवडाभरापूर्वी तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी सखोल चौकशी करून मुंबई नाका पोलीस ठाण्यात कारडा यांच्यासह संशयित व्यवस्थापकीय संचालक मनोहर कारडा, देवेश कारडा, संदीप शहा यांच्याविरुद्धही मुंबई नाका पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पथकाने रात्री उशिरा कार्डा यांना अटक केली असून जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यालयांना पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने 3 नोव्हेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कारडा यांच्याविरुद्ध मंगळवारी दिवसभरात चार ते पाच तक्रारी नव्याने प्राप्त झाल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
नरेश कारडा यांची कारडा कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम फर्म आहे. कारडा कन्स्ट्रकशनच्या माध्यमातून अशोका मार्ग या परिसरात नरेश कारडा यांनी 2019 मध्ये बांधकाम प्रकल्प सुरू केला होता. या बांधकाम प्रकल्पातील दोन गाळ्यांसाठी लुणावत यांना दोन गाळे कारडा देणार होते. त्यासाठी कारडा यांनी फिर्यादीकडून 1 कोटी 20 लाख रुपये घेतले होते. बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात होत नसल्याने तक्रारदारांनी कारडा यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र कारडांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांना अटक करण्यात आलीआहे.
इतर महत्वाची बातमी :