नाशिक : नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख (Hemant Parakh) यांच्या अपहरण प्रकरणात नाशिक पोलिसांनी (Nashik Police) महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी हेमंत पारख यांचं अपहरण करण्यात आले होते. संशयितांनी त्यांना सुरतजवळ सोडलं होत. त्यानंतर ते सुखरूप घरी पोहचले होते, मात्र अपहरण (Kidnapped) केल्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कोटी रुपयांची खंडणी संशयितांनी वसूल केली. या प्रकरणी तपास सुरु असताना परराज्यातील सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. 


नाशिक (Nashik) येथील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख (Hemant Parakh) यांचे शहरातील इंदिरानगर परिसरातील राहत्या घराबाहेरुन 2 सप्टेंबरला अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. सुदैवाने दुसऱ्या दिवशी दुपारी ते घरी सुखरुप परतले होते, मात्र या अपहरणात परराज्यातील टोळीचा समावेश असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या टोळीने दोन कोटींच्या खंडणीसाठी पारख यांचं अपहरण केले होते, त्यानंतर खंडणीची रक्कम ताब्यात घेऊन त्यांना सुरतजवळ सोडून देण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असताना परराज्यातील टोळीचा हात असल्याचे समोर आले. तर या अपहरणामागे इगतपुरीचा मास्टरमाइंड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


दरम्यान 2 सप्टेंबर रोजी इंदिरानगर येथून बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण करण्यात आले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी ते सुखरूप घरी पोहचले होते. याप्रकरणी अक्षय धैर्यसिंग देशमुख, यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती की, त्याचे पार्टनर हेमंत पारख यांचे राहते घरासमोरून अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन त्यांना गाडीत बळजबरीने फोर व्हिलर गाडीत टाकुन अपहरण करून त्यांना दोन कोटी रूपयाची खंडणी मागितली होती. यावरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपासासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमून तपास सुरु केला होता. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी , यांसह इतर तांत्रिक माहीतीच्या आधारे संशयित हे जोधपूर राजस्थान (Rajsthan) भागातील असल्याची माहीती मिळाली. तसेच संशयित महेंद्र बिष्णोई याने त्याचे राजस्थान येथील साथीदार यांच्या मदतीने हेमंत पारख अपहरण करून खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले. 


इगतपुरीचा मास्टरमाईंड... 


दरम्यान पोलिसांनी राजस्थान गाठून संशयित महेन्द्र उर्फ नारायणराम बाबूराम बिष्णोई, पिंटू उर्फ देविसींग बद्रीसिंग राजपूत, रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई यांना ताब्यात घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे या अपहरण प्रकरणात मास्टरमाईंड हा इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील लहांगेवाडी येथील अनिल भोरु खराटे असल्याचे समोर आले. नाशिकच्या खराटे यानेच गुन्ह्याचा कट रचला, हेमंत पारख यांच्याबाबत सगळी माहिती पुरविली होती, असेही निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयितांकडून खंडणी स्वरूपात मागितलेल्या 2 कोटी रक्कमेपैकी एक कोटी तेहतीस लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच बोलेरो कॅप्मर गाडी, देशी बनावटीचा कटटा, सहा जिवंत राउंड असा 8 लाख 32 हजार 500 रुपये असा एकूण 1 कोटी 41 लाख 32 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik : अपहरण केलं, डोळ्यावर काळी पट्टी बांधली अन् सुरतजवळ सोडलं, नाशिकचे हेमंत पारख घरी परतले, पण...