नाशिक : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना त्यांना धमकीचा एक मॅसेज आला होता. यानंतर नाशिक पोलिसांनी संशयिताचा तपास करत असताना छत्रपती संभाजीनगरातून (Chatrapati Sambhajinagar) एकाला ताब्यात घेतले आहे. इंद्रनील विभास कुलकर्णी असे संशयिताचे नाव आहे. मात्र धमकीचा कॉल कुणाच्या सांगण्यावरून केला हे अद्याफ स्पष्ट झाले नसल्याचे समोर आले आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. अनेकांकडून या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता. मात्र ब्राम्हण समाजाबद्दल आपण काही बोललो नसल्याचे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले होते. याच दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांना फोनद्वारे संपर्क साधून एका अज्ञात कॉलरने शिवीगाळ केल्याची घटना तीन दिवसांपुर्वी घडली होती. याबाबत भुजबळ यांनी नाशिक पोलीस (Nashik Police) आयुक्तांना तोंडी तक्रार दिली होती. त्यावरून नाशिक शहर आयुक्तालयाचे गुन्हे शोध एक हे पथक संशयिताच्या मागावर होते. तपास सुरु असताना इंद्रनील कुलकर्णी यास छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. 


दरम्यान नाशिकमधील मखमलाबादमधील (Makhamalabad) एका शाळेतील कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी एका समाजाच्या भावना दुखविणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून नवीन वादळ उभे राहिले. यानंतर भुजबळ यांना एका मोबाइल क्रमांकावरून थेट फोन आला. त्या कॉलरने त्यांना अश्लील भाषेचा वापर करत शिवीगाळ केल्याचे सांगण्यात आले.  यामुळे तो मोबाइल क्रमांकावरून राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अंबड पोलीस ठाण्यत (Ambad Police) फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून मंगळवारी 12 वाजता अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-1च्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून कॉलर संशयीत इंद्रनील विभास कुलकर्णी यांना रात्री ताब्यात घेतले. त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. संशयित कुलकर्णी यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलरचा व्यवसाय असल्याचे सुत्रांकडून समजते.



काय आहे प्रकरण?


काही दिवसांपूर्वी नाशिक येथील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांना जिवे मारण्याचा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर भुजबळ यांनी नाशिक पोलिसांना तोंडी तक्रार देत याबाबत माहिती दिली होती. नाशिक पोलिसांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला तपास करण्यास सांगितले. यानुसार तपास सुरु असताना कॉलवरुन आलेल्या नंबरचा तपास करत गुन्हे शोध पथक थेट संभाजीनगरला पोहचले. या ठिकाणाहून इंद्रनील कुलकर्णी या संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. 


ब्राह्मण समाजाकडून आज निषेध सभा


मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील समस्त ब्राह्मण समाजातर्फे आज सायंकाळी त्र्यंबकरोड येथील अभ्यंकर सभागृह, येथे जाहीर निषेध सभेचे आयोजन केले आहे. नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित राहणार आहेत, मंत्री भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त ब्राह्मण समाजातर्फे करण्यात आले आहे.



इतर महत्वाची बातम्या : 


 


Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी