नाशिक : 'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नका, ते पण भरकटलेले आहेत. ते भांग पीत नसतील, पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल. अशी जी माणसं आहेत, जी नशेच्या बाजारात फिरत आहेत. त्या नशेबाजांमुळे त्यांची मती गुंग झाली' असल्याची टीका संजय राऊत यांनी केला आहे. एकीकडे एक पिढी बरबाद होताना दिसत असताना दुसरीकडे तुम्ही राजकारण करत असल्याचा आरोप देखील यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. 


आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाचा विराट मोर्चा काढण्यात येत आहे. नाशिकच्या ड्रग्ज प्रकारांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येत असून या पार्श्वभूमीवर आज सकाळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, तरुण पिढी शाळा कॉलेजातील मुले या ड्रग्सच्या (Drug) आहारी जात आहेत. म्हणून या मोर्चामध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं. त्याचबरोबर अनेक संस्थांनी देखील यासाठी पुढाकार घेतला असून त्यादेखील विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहेत. मात्र अशातच माध्यमिक शिक्षण विभागाने एक पत्र काढला आहे की, या मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये, नाशिक शहराला (Nashik) लागलेलं हे गालबोट पुसावं म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असून यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. मात्र दुसरीकडे शिक्षण विभागच अशा प्रकारचा फतवा काढत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे.


मात्र मुंबईहून उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) या नाशिकमध्ये दाखल झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत ठाकरे गटाच्या मोर्चात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये, असे आदेश काढण्याचा सूचना देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.


देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फारस लक्ष देऊ नका, ते पण भरकटलेले आहेत. ते भांग पीत नसतील, पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल. अशी जी माणसं आहेत, जी नशेच्या बाजारात फिरत आहेत. त्या नशेबाजांमुळे त्यांची मती गुंग झाली असल्याची टीका संजय राऊत यांनी केला आहे. एकीकडे एक पिढी बरबाद होताना दिसत असताना दुसरीकडे तुम्ही राजकारण करत असल्याचा आरोप देखील यावेळी संजय राऊत यांनी केला.


महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री पाहिले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था पाहिली. सुडाने कधीही कारवाया केल्या नाहीत, आजूबाजूला बसलेल्या गुंड, मवाली, माफियांची बाजू देवेंद्र फडणवीस घेत असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले. गृहमंत्र्यांकडे इतर सगळी माहिती असते, मात्र माफी यांची माहिती नसते इतर काही घटना घडली की, विरोधकांवर टीका करायची, मात्र हा महाराष्ट्र आम्हाला वाचवायचा आहे. ड्रग्स गुजरात मधून येत आहे, गुजरातची बाजू घेत आहेत का? की आमदारांची बाजू घेत आहेत, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. 


मोर्चा काढून आंदोलन संपणार नाही


शिवसेनेचा मोर्चा राजकीय कारणासाठी नाही तर सामाजिक कारणासाठी आहे. आज सकाळी 11 वाजता मोर्चा सुरु होणार असून मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. संजय राऊत म्हणाले की, ड्रग्ज रॅकेटमध्ये सत्तेतील आमदार सहभागी आहेत. मंत्र्यांवर आरोप झाले, ड्रग्ज प्रकरणी काही मंत्र्यांना हप्ते मिळतात. शिवसेनेने मोर्चाची घोषणा केल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भरकटले असून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फडणवीसांसारखा गृहमंत्री हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून गुंड, मवाली, माफियांची बाजू घेत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. अनेक विद्यार्थी ड्रग्जच्या आहारी या मोर्चात पालक, शिक्षक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं, ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे गुजरात इंदूरपर्यंत आहेत. मात्र अशातच विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी करु नये, असा फतवा काढण्यात आला. यासाठी निलम गोऱ्हेंनी बैठक घेतली, हे चुकीचं आहे. मात्र मोर्चा काढून आंदोलन संपणार नाही.. हे थांबलं नाही तर सेना रस्त्यावर उतरेल. 


इतर महत्वाची बातमी : 


"ड्रग्ज प्रकरणात नाशिकच्या आमदारांपासून ते नांदगावपर्यंत हफ्ते, माझ्याकडे कागद तयार", संजय राऊतांचा गौप्यस्फोट