नाशिक : ठाकरे गटाचे खासदार (Shiv Sena Uddhav Thackeray) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ड्रग्ज प्रकरणावरून (Drugs Case) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दादा भुसेंवर (Dada Bhuse) जोरदार निशाणा साधलाय. कोणाला किती हफ्ते जातायत त्याचा माझ्याकडे कागद तयार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना केला आहे. पोलिसांना खुलेआम हफ्ते जात आहेत.  इकडच्या आमदारापासून नांदगावपर्यंत हफ्ते जात असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे देवयानी फरांदे आणि सुहास कांदेंना लक्ष्य केले आहे.


सध्या नाशिकमध्ये  कोणाच्या संगनमताने किंवा आशीर्वादाने सुरू आहे ? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.  नाशिक ते मालेगावपर्यंत फक्त ड्रग्जचा व्यापार आणि  त्यातून आर्थिक उलाढाल केली जात असल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री दादा भुसेंवर करत कोणाला सोडणार नाही म्हणजे काय ? यात तुमचे हफ्तेबाज आहेत त्यांना का सोडलंय ? असा फडणवीसांनाही त्यांनी प्रश्न विचारलाय. 


नाशिकमध्ये ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी उद्ध्वस्त


संजय राऊत म्हणाले,  नाशिकमध्ये ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे.  शाळा, कॉलेजमध्ये ड्रग्ज मिळत आहेत. पोलिसांना खुले आम हफ्ते दिले जात आहे. कोणाला किती हफ्ते दिले जातात याचा माझ्याकडे कागद आहे.  नाशिकच्या आमदारांपासून नांदगावपर्यंत हफ्ते दिले जातात. नाशिकमध्ये जे सुरू आहे ते कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. नाशिक ते मालेगावमध्ये फक्त ड्रग्जचा व्यापार सुरू असून त्यातून आर्थिक उलाढाल होते.  राजकारणी आणि पोलिसांना हफ्तेबाजी ही राज्याची स्थिती आणि नाशिक ज्वलंत उदाहरण आहे. कोणाला सोडणार नाही म्हणजे काय?  तुमचे हफ्तेबाज आहेत त्यांना का सोडलंय ?


हा मोर्चा राजकीय नाही  तर तरुण पिढी वाचवण्यासाठी


नाशिकमधील ड्रग्ज, अवैध धंद्यांविरोधात ठाकरे गट चांगलीच आक्रमक झाले आहे. नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला जाणार आहे.  या मोर्च्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले,  हा मोर्चा राजकीय नाही  तर तरुण पिढी वाचवण्यासाठी काढण्यात आला आहे.  


निलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर 


ललित पाटील ड्रग्जप्रकरणी शिंदे गटाच्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.  ललित पाटीलने अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला नसल्याचा आरोप निलम गोऱ्हे यांनी केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, निलम गोऱ्हेंना पण हप्ता जातो का?  


हे ही वाचा :