नाशिक:  शहरातील ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket), अंमली पदार्थाचे सेवन वाढती गुन्हेगारी, रोलेट, बिंगोचे, जुगाराचे अड्डे , पोलिसांची निष्क्रियता, या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) आजच्या ड्रग्ज विरोधी मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार नाही यासाठी  नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चक्क पत्रक काढले आहे. मोर्च्यात विद्यार्थी सहभागी झाले तर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना इशारा दिला आहे. तर ठाकरे गटाने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात हजेरी लावण्याचे आवाहन केले आहे. 


नाशिक शहरात ड्रग्ज रॅकेट विरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली 11 वजाता मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाच्या आजच्या ड्रग्ज विरोधी मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार नाहीत याची दक्षता घ्या, नाहीतर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना इशारा देण्यात आला आहे.  नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्रक काढले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना निर्देश दिले आहेत.  विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येऊ नये अशा आशयाचे एमआयएम पक्षाकडून  प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्याच निवेदनाची  दखल घेण्यात आली आहे. 




ठाकरे गटाचा नाशिकमध्ये मोर्चा


ड्रग्ज माफिया ललित पाटील,भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांनी नाशिक शहरात ड्रग्जचा कारखाना सुरू केल्याचं पोलीस तपासत उघडकीस आले. मुबंई, पुणे पोलीस नाशिकमधे येऊन कारवाई करत असताना नाशिक पोलीसांना त्याची माहीती नसल्यानं पोलिसांची निष्क्रियता बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे याच्यावरही ड्रग्स प्रकरणात आरोप झल्यानं राजकीय वातावरण तापले आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना मोर्चा काढत आहे, विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी यात सहभागी होणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. शालिमार मधील शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात, संत गाडगेबाबा पुतळा,मेनरोड, रविवार कारंजा, MG रोड, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे. 


नाशिकमध्ये ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी उद्ध्वस्त : संजय राऊत 


संजय राऊत म्हणाले,  नाशिकमध्ये ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे.  शाळा, कॉलेजमध्ये ड्रग्ज मिळत आहेत. पोलिसांना खुले आम हफ्ते दिले जात आहे. कोणाला किती हफ्ते दिले जातात याचा माझ्याकडे कागद आहे.  नाशिकच्या आमदारांपासून नांदगावपर्यंत हफ्ते दिले जातात. नाशिकमध्ये जे सुरू आहे ते कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. नाशिक ते मालेगावमध्ये फक्त ड्रग्जचा व्यापार सुरू असून त्यातून आर्थिक उलाढाल होते.  राजकारणी आणि पोलिसांना हफ्तेबाजी ही राज्याची स्थिती आणि नाशिक ज्वलंत उदाहरण आहे. कोणाला सोडणार नाही म्हणजे काय?  तुमचे हफ्तेबाज आहेत त्यांना का सोडलंय? 


हे ही वाचा :


"ड्रग्ज प्रकरणात नाशिकच्या आमदारांपासून ते नांदगावपर्यंत हफ्ते, माझ्याकडे कागद तयार", संजय राऊतांचा गौप्यस्फोट