नाशिक : आज नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात (Ganesh Chaturthi) आगमन होत असून या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक शहरात जवळपास साडेतीन हजार पोलिसांचा ताफा नाशिकच्या गणेशोत्सवासाठी उभा असणार आहे. तसेच ग्रामीण भागातही 2 हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी (Police Bandobast) तैनात करण्यात आले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
आज सार्वजनिक मंडळासह घरोघरी बाप्पाचं आगमन होत आहे. काल दुपारपासूनच बाजार पेठा फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच नाशिककर (Nashik Ganeshotsav) देखील सज्ज असून वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर गणराया विराजमान होणार आहे. पुढील दहा शहरासह जिल्ह्यात चैतन्य वातावरण असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस (Nashik) प्रशासन देखील सज्ज झाले आहे. यासाठी विविध पोलिसांची कुमक ठिकठिकाणी तैनात असणार आहे. शहरात साधारण 40 ते 50 सार्वजनिक गणेश मंडळे असून कोणतीही घटना घडू नये, यासाठी खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. यासाठी शहरात 3000 पोलीस अंमलदारांसह जिल्ह्यात 500 कर्मचारी व अतिरिक्त पथकांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये नियमित पोलीस ठाण्यांसह दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल आणि दहशतवाद विरोधी पथकाचाही समावेश आहे.
नाशिक शहर (Nashik Police) आणि ग्रामीण पोलीस दल सण, उत्सवकाळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क झाले आहेत. शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेत चोख आखणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नाशिक शहर आणि परिसरात आजपासून सुरू होणारा गणेशोत्सव आणि दहा दिवसांवर येऊन ठेपलेला ईद-ए-मिलादचा सण या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात 3000 पोलीस अंमलदारांसह जिल्ह्यात 500 कर्मचारी आणि अतिरिक्त पथकांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच राज्य राखीव दलाच्या एका तुकडीसह स्ट्रायकिंग फोर्स, दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. सण-उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी 'खाकी' सज्ज झाली आहे.
असा असेल शहर आणि ग्रामीण पोलीस बंदोबस्त
नाशिक शहरात आजपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने निर्विघ्न उत्सवासाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली 8 सहायक पोलीस आयुक्त, 45 पोलिस निरीक्षक, 125 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 860 अंमलदार, 290 महिला अंमलदार, 1050 होमगार्ड, याप्रमाणे अतिरिक्त वाढीव कुमक तैनात करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस दलाकडून 127 अंमलदार, 290 नवीन अंमलदार, पंधराशेहून अधिक होमगार्ड, दंगल नियंत्रण पथकाच्या सहा तुकड्या, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर शहर पोलीस दलाकडून 3000 अंमलदार 1000 होमगार्ड, तसेच दंगल नियंत्रण पथक राज्य राखीव दल, जलद प्रतिसाद पथक, गुन्हे शोध तीन पथकांसह इतर चार पथके तैनात असणार आहेत.