नाशिक : सणासुदीचे (Festive Season) दिवस सुरू झाल्याने मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिकच्या (Nashik) औषध प्रशासनाकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या अन्नपदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर परराज्यातून येणाऱ्या सुमारे दोन लाखाच्या मिठाईचा साठा (Mithai) जप्त करण्यात अन्न औषध प्रशासनाला यश आल आहे, या कारवाईमुळे मिठाई विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

नाशिकच्या (Nashik FDA) अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने भेसळयुक्त पदार्थ (Adulterated substances) विक्री तसेच तयार करणाऱ्या कारखाना व दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरी देखील शहरात भेसळयुक्त पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असून अशातच मिठाईच्या पदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. गुजरातमधून (Gujrat) नाशिक शहरात संशयास्पद मिठाई विक्रीसाठी येत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार शहरातील द्वारका सर्कल जवळ अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले. गुजरात राज्यातून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलच्या बसेसची तपासणी केली असता शहरातील ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाजवळ उतरवण्यात आले.

 

दरम्यान गुजरात राज्यातून आणलेल्या भेसळयुक्त मिठाईचा वापर हा नाशिक शहरातील मिठाई (Sweets) विक्रेते हे मिठाई, मलाई पेढा, मलाई बर्फी, कलाकंद आदी पदार्थ तयार करण्यासाठी करतात, असा संशय अन्न व औषध प्रशासनाला आल्याने व त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुधाचा समावेश नसल्याने याविरूध्द अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहिम राबवून भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे. जप्त केलेले अन्नपदार्थ मे. अनुष्का स्वीट सप्लायर्सचे मालक रविकांत सिंग यांच्याकडून स्पेशल बर्फीची 11 बॅग्ज किंमत रुपये 41 हजार, मे. डीकलशियन स्वीटसचे मालक श्याम यांच्याकडील 3 बॅग्जची किंमत 11 हजार रूपये तर कन्हैया यांच्याकडील 5 खोक्यांची किंमत 17 हजार 290 रूपये याप्रमाणे जप्त केलेल्या भेसळयुक्त मिठाईची एकूण किंमत 69 हजार 290 रूपये असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

 

नाशिक शहरातील द्वारकाजवळील सोनाका ॲग्रो फुडचे मालक संदेश कासलीवाल यांनी मागविलेल्या मिठाईच्या साठ्यातून रिच स्वीट डिलाईटचा 298 किलो व 250 किलोची एकूण किंमत 74 हजार 500 किंमतीचे जप्त करण्यात आलेले आहे. त्यानंतर कल्पेश नवरतन गुप्ता, गुरुगोविंद कॉलेज जवळ, नाशिक यांच्याकडून ट्रॅडिशनल स्वीटची 14 पाकिटे, 148 किलो असून, 29 हजार 660 रूपये किंमतचा साठा नमुना घेवून जप्त करण्यात आला आहे. तसेच लच्छाराम चौधरी यांच्या महालक्ष्मी स्वीट येथून कलाकंद स्वीट्सचा नमुना त्यांच्याकडून घेवून 13 हजार 920 रुपये किंमतीचा 58 किलो जप्त करण्यात आला आहे. याप्रमाणे संपूर्ण जप्त करण्यात आलेल्या भेसळयुक्त अन्नपदार्थाची एकूण किंमत 2 लाख 10 हजार 910 रूपये असल्याचे समोर आले आहे. 

 

अन्न व औषध प्रशासनाकडून आवाहन 


 

आगामी गणपती उत्सव, नवरात्रोत्सव व दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम सुरूच राहणार आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी दुधापासुन तयार करण्यात आलेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत किंवा कसे याची खात्री करुनच मिठाई खरेदी करावी. त्याचप्रमाणे सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुधापासूनच बनविलेल्या मिठाईची विक्री करावी तसेच त्याबाबत दुकानात स्पष्ट फलक लावण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. नागरीकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काहीही संशय असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

 

इतर महत्वाची बातमी :