नाशिक : नाशिककरांचा (Nashik) अमाप उत्साह, नाशिक ढोलचा गजर, डीजेचा दणदणाटासह नाशिकमधील (Nashik Ganesh Visarjan) गणेश विसर्जन मिरवणूक रात्री एक वाजता संपली. किरकोळ वाद वगळता शांततेत लाडक्या गणरायाला नाशिककरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यावेळी गोदाघाटांसह विसर्जन (Ganesh Visarjan) मार्गावर प्रचंड संख्येने नाशिककरांची उपस्थिती पाहायला मिळाली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी साद घालत गणरायाला साश्रू नयनांनी नाशिककरांनी निरोप दिला. 


नाशिकमध्ये (NashikGanesh Visarjan) गेल्या दहा दिवस गणेशोत्सवात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. काल सकाळी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत अकरा वाजता सुरवात झाली होती. जवळपास 23 सार्वजनिक मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. मिरवणूक सुरु झाल्यापासून मिरवणूक मार्गावर नाशिककरांची गर्दी पाहायला मिळत होती. जस जशी मिरवणूक पुढे सरकत होती, तस तस नाशिककरांचा उत्साह वाढत होता. मिरवणुकीवर पावसाचे सावट होते, मात्र शेवटपर्यंत पाऊस काही बरसला नाही, आणि गणपती बाप्पाचा उत्सव चैतन्यमय वातावरणात पार पडला. सकाळी अकरा वाजता सुरु झालेली मिरवणूक रात्री एक वाजेपर्यत मिरवणूक शांततेत सुरु होती. शेवटी एकच्या ठोक्याला मिरवणूक बंद झाली. पोलिसांच्या सूचनेनुसार मंडळांनी ढोलवादन, डीजे बंद करून शांततेत विसर्जन करण्यात आले. 


दरम्यान सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या क्रमानुसार अकरा वाजेला मिरवणूक सुरु झाली. यानंतर सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास पहिला मानाचा महापालिकेचा गणपती गंगाघाटावर विसर्जन करण्यात आले, तब्बल नऊ तासांनी पहिल्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर मात्र नाशिककरांची गर्दी वाढायला सुरवात झाली होती. काही मंडळांनी डीजेचा दणदणाट (DJ) सुरु ठेवल्याने तरुणांची संख्या अधिक असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मिरवणूक लांबत गेली. सकाळी अकरा वाजेला सुरु झालेला विसर्जन सोहळा रात्री उशीरापर्यंत सुरु होता. मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी गणपती विसर्जित झाले. साधारण एक वाजेपर्यंत सर्व मिरवणूक आटोपून गणेश विसर्जन पार पडले होते. 


नाशिककरांचा अमाप उत्साह 


दरम्यान यंदाच्या मिरवणुकीत 3000 हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नाही. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा मिरवणुक मार्गावर तैनात होता. दुपारच्या सुमारास भद्रकाली परिसरात मिरवणूक आली असताना दोन तरुणांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. मात्र पोलिसांच्या तत्परतेने लागलीच दोघांना ताब्यात घेतले होते. तर साडे आठ वाजेच्या सुमारास दोन गणेश भक्त गोदाघाटावर बुडाल्याची घटना घडली होती. यावेळी मनपा बचाव पथकाकडून यांचा शोध उशिरापर्यंत सुरु होता. त्यानंतर गणपती बाप्पाचा उत्सव चैतन्यमय वातावरणात पार पडला. सकाळी अकरा वाजता सुरु झालेली मिरवणूक रात्री एक वाजेपर्यत ही मिरवणूक सुरु होती. रात्री एकच्या ठोक्याला साऊंड सिस्टीम आणि ढोल वादन गणेश मंडळांनी बंद केले. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Ganesh Visarjan : नाशकात गणेशोत्सवाचा जल्लोष, जंगी मिरवणुकांची धूम