नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील पंचवटी परिसर एका खूनाच्या (Murder) घटनेने हादरून गेला आहे. शहरातील कुसुमाग्रज उद्यानाजवळ काही मित्र मद्यपान करत असतानाच आपापसात झालेल्या वादातून सागर शिंदे (Sagar Shinde) या 28 वर्षीय तरुणावर सोबत असलेल्या मित्रांनी चाकूने वार केले. पोटावर आणि डोक्याला गंभीर ईजा पोहोचल्याने तसेच यात रक्तस्त्राव अधिक झाल्याने सागरचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. 


नाशिकमधील (Nashik) ड्रग्ज प्रकरण चर्चेत असताना आता खुनाची घटना समोर आल्याने गुन्हेगारीचा (Crime) बिमोड करण्याचे मोठं आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे. मित्राने वडिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या रागातून मुलाने इतर मित्रांच्या मदतीने त्याचा खून केल्याचा समोर आले आहे. नाशिक शहरातील मखमलाबाद (Makhamlabad) परिसरातील गुंजाळ मळा भागात ही घटना घडली आहे. आकाश गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सागर विष्णु शिंदे आणि योगेश वाघ, अशोक वाघ हे मित्र एका दुकानाच्या बाहेर ओट्यावर गप्पा मारत होते. याचवेळी संशयित केदार इंगळे, ऋषिकेश आहेर, दीपक इंगळे, नकुल चव्हाण आणि इतर लाल रंगाच्या कारसह मोटर सायकलने आले. यावेळी संशयित केदार इंगळे यांनी भांडणाची कुरापत काढून सागर शिंदे यांच्यावर धारदार चॉपरने डोक्यावर, मानेवर, छातीवर वार केले. यावेळी रक्तस्राव अधिक झाल्याने सागर शिंदे जागीच ठार झाला


प्राथमिक माहितीनुसार मखमलाबाद रोडवर क्रांतीनगर परिसरात राहणारा सागर विष्णु शिंदे याचे परिसरात राहणाऱ्या केदार इंगळे यांच्या वडिलांशी काहीतरी कारणावरून वाद झाले होते. त्यावेळी संशयित आरोपी केदार इंगळेच्या वडिलांसोबत सागरची बाचाबाची झाली होती आणि हाच राग मनात धरून सागरची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे. पंचवटी पोलिस (Panchavati Police) ठाण्यात याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कसबे सुकेणे इंगळेसह इतर चौघांना अवघ्या काही तासात पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर इतर दोन संशयित आरोपी हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असून मखमलाबाद रोडवर भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 


11 हजार रुपयांची फसवणूक 


ऑनलाइन व्यवहारात 11 हजार रुपयांची फसवणूक झाल्याने सिन्नर तालुक्यातील वावी येथील तरुणांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. फसव्या ऑनलाईन कंपनीच्या संपूर्ण कंपनीस पाठवले. याच्या मोबदलत कंपनी त्याला अधिकचा मोबदला देणार होती. परंतु कंपनी त्याला पैसे पाठवले. त्याच्याकडून अधिक पैशांची मागणी केली. त्याला त्रस्त होत त्याने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात कंपनीच्या नावासह पत्त्याचा उल्लेख केला आहे. राहुल हा अविवाहित होता रोजंदारीवर काम करून तो उदरनिर्वाह करत होता. कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या अमिषाला तो बळी पडला आणि यातच तो आपला जीव गमावून बसल्याचं समोर आलंय. 



इतर महत्वाची बातमी : 


Nashik Malegaon Crime : 'जिथं दशहत केली, तिथंच पोलिसांनी सराईत गुंडाची काढली धिंड', मालेगाव पोलिसांनी दिला निर्भीडतेचा संदेश