नाशिक : माझ्या राजकीय कारकिर्दीत अनेक मराठा नेत्यांसोबत काम करत होतो, माझे सुद्धा काहीतरी योगदान आहे. मराठा बांधवासाठी पवार साहेबांसोबत माझेही योगदान आहे. मात्र, आज मला मराठ्यांनी मोठं केले असे सांगून शिव्या देतात, पण मला मोठं केलं ते शिवसेना (Shivsena) आणि बाळासाहेबांनी केलं असे स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहे. तसेच मराठा समाज नादान किंवा असंस्कृत नाही, माझ्यामुळे त्यांच्यात फूट पडणार नाही, असा विश्वास देखील भुजबळांनी व्यक्त केला.
मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) शहरातील भुजबळ फार्मवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंतरवाली येथील सभेत छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. दरम्यान, यावेळी छगन भुजबळ यांनी देखील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात केलेल्या आरोपांवर उत्तर देत 'मला मराठ्यांनी मोठं केले असे सांगून शिव्या देतात, पण मला मोठं केलं ते शिवसेना आणि बाळासाहेबांनी केलं, माझा आजही मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध नाही, मात्र हे लोक माझ्याच मागे लागले असून एक अजून लागले तर काय होणार नाही, असे भुजबळ म्हणाले. तर दुसरीकडे भुजबळांनी केलेल्या आरोपावर मनोज जरांगे यांनी सांगितले, इथल्या कष्टकरी मराठ्यांचा घामाचा पैसा आहे, त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया देत जरांगेना ज्यांनी पैसे दिलेत, माझ्या सगळ्यांना शुभेच्छा असल्याचे भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, ओबीसींच्या बाबतीत (OBC) एक मोठा समाज बोलत असेल तर आम्ही गप्प बसलो तर आम्हाला ते कबुल आहे, असं होईल, त्यामुळे ते बोलावं लागेल ना.. 375 जातीत मराठा समाज हा मोठा समाज येऊन बसला तर कुणालाच फायदा होणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, माझा विरोध नाही, आणि माझी ही भूमिका आत्ताची नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार, नाना पटोले आणि मराठा नेते सुद्धा तेच बोलत आहे. म्हणून भुजबळ विरोध आहे असे वाटतं असल्याचे ते म्हणाले. मनोज जरांगे म्हणाले की, मराठा बांधवात फूट पाडण्याचे काम सुरु आहे. पण मराठा समाज नादान किंवा असंस्कृत नाही, माझ्यामुळे त्यांच्यात फूट पडणार नाही. जरांगे काय बोलतात ती त्यांची वैयक्तिक संस्कृती आहे, ती मराठा समाजची नाही. त्यामुळे अनेक लोक माझ्या मागे लागले आहेत, एक अजून लागले तर काय होणार नाही, असेही भुजबळ म्हणाले.
शिवसेना आणि बाळासाहेबांनी मोठं केलं
दरम्यान छगन भुजबळ यांना धमकी आल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहे. अनेक कॉल येत आहे. शिव्यांचा वर्षाव होत आहे, पण अशा धमक्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर अनेक हल्ले झाले. 91 मध्ये शिवसेना सोडली ती ओबीसी प्रश्नावर सोडली होती. मी ओबीसीचा प्रचार प्रसार केला, पण आज मला मराठ्यांनी मोठं केले असे सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं केलं ते शिवसेना आणि बाळासाहेबांनी केलं. अन् चांगल्या समाजासाठी माझा जीव जाणार असेल तर आनंद आहे, लोक अंथरुणावर पडून किंवा अपघात होऊन लोक मरतात, मी चांगल्या कामासाठी मेलो तर काही हरकत नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाची बातमी :