राधानगरी (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात (Kolhapur Crime) सासरी विवाहितांच्या छळाची माालिका सुरुच आहे. मुलगा नाही म्हणून छळ केल्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता राधानगरी तालुक्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली. राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील केळोशीपैकी माळवाडीमध्ये नवविवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सविता दत्तात्रय शिंदे (वय 24) असं तिचं नाव आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. सविताच्या नातेवाईकांनी पती, सासू, सासऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सविताचा लग्न झाल्यापासून माहेरी छळ सुरु होता. तिला दीड वर्षांची लहान मुलगी आहे.


छळाला कंटाळून माहेरी आली 


सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून सविता चार महिन्यांपूर्वी माहेरी चक्रेश्वरवाडीत आली होती. माहेरी आल्यानंतर वाद मिटवून सविताला परत सासरी पाठवण्यात आले. मात्र, सासरी गेल्यानंतर सविताचा पुन्हा छळ सुरु करण्यात आला. त्यामुळे दररोजच्या छळाला कंटाळून गेलेल्या सवितानं मंगळवारी सकाळी विषारी औषध प्राशन केलं. त्यामुळे तिला उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तसेच उपचारास प्रतिसाद न मिळाल्यानं  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. बुधवारी सासरी केळोशीपैकी माळवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलीची मांडली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासू, सासऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. 


मुलगा होत नसल्याने छळ; विवाहितेनं गळफास घेत आयुष्य संपवलं


दरम्यान, 15 दिवसांपूर्वी मुलगा होत नसल्याने सासरी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटालून दोन मुलींची आई असलेल्या विवाहिताने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) करवीर तालुक्यातील सडोली खालसात घडली होती. अस्मिता केदारी चौगले (वय 30, रा. कोथळी, ता. करवीर) असे या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले आणि सासरा गणपती गुंडू चौगले (तिघे रा. कोथळी, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या