नाशिक : 'वर्षभरापूर्वी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शिवसेनेत प्रवेश करणार होते, मात्र मी दिल्लीत असताना ही गोष्ट समजली आणि त्यानंतर लागलीच दिल्लीहून मुंबई गाठत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भुजबळांच्या बाबतीत शिवसैनिकांना (Shivsanik) अनेकदा रोषाला सामोरे जावे लागले आहे, अनेकांवर केसेस दाखल झाल्या, खुद्द बाळासाहेबांवर देखील दोन गुन्हे दाखल झाले होते, या सर्व गोष्टींचा उहापोह उद्धव ठाकरे यांना करून दिल्यानंतर छगन भुजबळ यांच्या प्रवेश रद्द केल्याचा महत्वपूर्ण गौप्यस्फोट माजी आमदार बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी केला आहे. 


एकीकडे उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे मोट बांधत असताना आज अचानक ठाकरे गटातील महत्वाचा शिलेदार असलेले माजी आमदार बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवाय 55 वर्षांपासून शिवसेनेशी (Shivsena) एकनिष्ठ राहूनही अंतर्गत वादांमुळे निष्ठावंत शिवसैनिकांना पदावरून पायउतार व्हावं लागत असेल तर कुठेतरी पक्ष प्रमुखांनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचं सल्ला बबनराव घोलप यांनी दिला. राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी शिवसेनेत घडलेली महत्वपूर्ण राजकीय गोष्टीचा देखील उलगडा केला. आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू करणारे राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट बबनराव घोलप यांनी या निमित्ताने केला. 


शिवसेना ठाकरे गटातील नेते बबनराव घोलप यांनी काल तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा दिल्यानंतर बबनराव घोलप यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. यावेळी ते म्हणाले की, वर्षभरापूर्वी छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये येणार होते, भुजबळांना शिवसेनेमध्ये घेणार होते. याबाबत सर्व चर्चा सुरू होत्या, त्यावेळी मी दिल्लीला गेलो होतो, याबाबत मिलिंद नार्वेकर (Milind narvekar) यांनी मला छगन भुजबळ प्रवेश करणार असल्याचे सांगितले. आज शेवटचा दिवस असून आजच प्रवेश होणार असल्याचे सांगितले. मी ताडकन उठून मुंबई गाठले, उद्धव ठाकरे यांना भेटलो, त्यांना समजावून सांगितले. छगन भुजबळ यांना प्रवेश देऊ नका, बाळासाहेब ठाकरेंवर ज्या माणसाने केसेस दाखल केल्या, माझ्यावर केसेस दाखल करून त्यांनी घरी बसवल आहे. मग मी कोणत्या पक्षात जायचं, उद्धव ठाकरे यांनी लागलीच या प्रवेशाला मज्जाव केला. त्यामुळे तेव्हा छगन भुजबळ यांचा पक्ष प्रवेश थांबला आणि शिवसेनेसाठी चांगला निर्णय झाल्याचे घोलप म्हणाले.  


अनेक माणसांना उभं केलं... 


दरम्यान बबनराव घोलप म्हणाले की, छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेसोबत अनेकदा गैरव्यवहार केले. 'बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, राज ठाकरे अशांवर केसेस दाखल केल्या होत्या. अनेक लोकांच्या माध्यमातून या केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. ज्या दिवशी हा प्रवेश सोहळा होणार होता, त्यावेळी त्या माणसांना सरते शेवटी उद्धव ठाकरे समोर उभं केलं आणि सत्य बाहेर आल. संबंधित माणसांना केसेस मागे घ्यायला लावल्या, असा सगळा घटनाक्रम बबनराव घोलप यांनी सांगितला. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Shivsena : राजीनाम्यानंतर माजी आमदार बबनराव घोलप यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी शिवसैनिक म्हणून...