जळगाव : सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यांनतर इंडीया (INDIA) नाव आलं, मात्र यानंतर या नावाची भीती वाटायला लागली. मग आता पक्ष फोडायचे कारभार सुरु केले, त्यानंतर आता इंडिया नावाचं बदलायचा घाट घातला जात आहे. पण आम्ही इंडिया, भारत, हिंदुस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वतःचे नाव देऊन टाकतील. पण आम्ही नाव बदलणार नाही, तर पंतप्रधान (PM) बदलणार असा विश्वास शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी व्यक्त केला आहे. 


आज उद्धव ठाकरे हे जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असून ते जाहीर सभेत बोलत होते. यावेळी इंडिया हे नाव बदलण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, एकीकडे भाजपकडून पक्ष फोडाफोडीचं राजकरण सुरु आहे. सत्तेसाठी पक्षांचे गळे घोटण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर देशात नवी आघाडी निर्माण झाली. या सत्तेला पायउतार करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन इंडियाची निर्मिती झाली, मात्र या इंडिया निर्मितीमुळे अनेकांना पोटदुखी होऊ लागली आहे. थेट देशाचे नावच बदलण्याचा घाट घातला जात आहे. मात्र आम्ही इंडिया, भारत, हिंदुस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. देशाला सुद्धा स्वतःच नाव देतात की काय? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 


उद्धव ठाकरे बोलत असताना कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात होत्या. देश का नेता कैसा हो, उद्धव ठाकरे जैसा हो. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्येच थांबवत, 'देश का नेता नाही, देश का नागरिक कैसा हो, या घोषणा देण्याची वेळ आली आहे. 'देश का नागरिक कैसा हो, शिवाजी महाराज के मावळे जैसा हो, इंडिया आघाडीनंतर केंद्र सरकार घाबरले आहे, कधी पडेल काही सांगता येत नाही. आधी त्यांना वाटत होते, आम्हाला आव्हान कोणी देऊ शकणार नाही', मात्र सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यांनतर इंडिया नाव आलं, यानंतर त्यांना इंडिया नावाची भीती वाटायला लागली, आता इंडिया आघाडी केली तर नाव बदलून टाकत आहेत. बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वतःचे नाव देऊन टाकतील. देशाला सुद्धा स्वतःच नाव देतात की काय? पण आम्ही नाव बदलणार नाही, पंतप्रधान बदलणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 


लोकांचं प्रेम मिळतंय... 


उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दौऱ्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी अहमदनगर दौरा केला. तेव्हा लोक सांगत होते, तुमच्या पायगुणाने पाऊस आला. मी सांगितले, निसर्गाची कृपा आहे, मी निमित्त मात्र आहे, अनेक माता भगिनी औक्षण करत होत्या, त्यांना थांबवत, आता ओवाळू नका, तुम्ही जेव्हा आनंदी व्हाल, तेव्हा तुमच्या आनंदात सहभागी होईल. त्याच दिवशी एक लहान मुलगा शिदोरी घेऊन आला. त्याचंही कौतुक वाटलं. एवढं सगळं प्रेम लोक देत आहेत. असा कोणता राजकारणी आहे, ज्याला एवढं प्रेम मिळत आहे. मोदी असो कोणीही असो, सर्वजण भाषण करताना उद्धव ठाकरे नाव घेतात. या लोकांनी माझा पक्ष संपवला ना, मग माझे नाव का घेतात." 


इतर महत्वाची बातमी : 


Udhhav Thackeray : कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना नाही, भाजपचे गुलाम बनू नका, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला