नाशिक : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali) येऊन ठेपली असून सर्व नाशिककरांना दिवाळी सणाची आतुरता आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होत असते. त्यामुळे ध्वनी आणि वायूप्रदूषणातही वाढ होत असल्याने यंदा दिवाळीच्या काळात 125 डेसिबलच्या वर आवाज असणारे फटाके फोडण्यास निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत फटाके फोडण्यास (Fireworks) बंदी असणार आहे. फटाका स्टॉल, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक रस्ता, शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांजवळ फटाके फोडण्यासही निर्बंध घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. 


दिवाळी सण (Diwali Festival) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सर्वच ठिकाणी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे दिवाळी फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणवर केली जाते. मात्र या दरम्यान अनेकदा अनुचित प्रकार घडत असतात. याला यावर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फटाक्यासंदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार 125 डेसिबलच्या (Desibal) वर आवाज असणारे फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. साखळी फटाक्यांसाठी आवाजाच्या मर्यादेच्या पातळीत 5 लॉग व 10 एन डेसिबलपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. फटाका विक्रेत्यांना फुटफुटी, मल्टिमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लायमध्ये पिवळा फॉस्फरस असलेल्या फटाके विक्रीला बंद राहील. लहान मुलांना फटाके विक्री करू नये, शांततेच्या ठिकाणी 100 मीटर दूर फटाके फोडावे अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. 


फटाका स्टॉल धारकांना आवाहन 


एकाठिकाणी 100 पेक्षा जास्त स्टॉल नसावेत. अशाप्रकारे एकापेक्षा जास्त समूह होत असतील तर दुसऱ्या प्रत्येक सुमहातील अंतर 50 मिटर पेक्षा कमी नसावे. स्टॉलच्या परिसरात तेलाचा दिवा, मेणबत्ती निषिध्द आहे. विद्युत प्रवाह वायरिंग योग्य रितीने केलेली आहे, याकडेस विशेष लक्ष देण्यात यावे. फटाक्याच्या दुकानाचा आपत्कालीन मार्ग हा नेहमी खुला असावा, त्यात कुठल्याही प्रकारचे अडथळे नसावे तसेच स्टॉलच्या ठिकाणी धुम्रपानास सक्त मनाई करणे बंधनकारक आहे. फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा असावी व दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नये. कुठल्याही प्रकारचा अपघात निर्माण होणार नाही, यासाठी योग्य ती सुरक्षाव्यवस्था व अग्निप्रतिबंधक उपाययोजना केलेली असावी. 25 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे, 3.8 से.मीटर पेक्षा जास्त लांबीचे व ऍटमबॉम्ब नावाने ओळखले जाणाऱ्या फटाक्यांची व क्लोरेटचा समावेश असलेली फटाके विक्री केली जाणार नाही.


फटाक्यांबाबत महत्त्वाचे आवाहन 


18 वर्षाखालील मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय त्यांना फटाके विक्री करु नये. शांतता क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यात येऊ नये. दरम्यान फुटफुटी किंवा तडतडी, मल्टीमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय या नावाने ओळखले जाणाऱ्या पिवळा फॉस्फरसयुक्त असलेल्या अत्यंत विषारी असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणार नाही. मनाई केलेले आपटबार व उखळी दारु उडविण्यास बंदी आहे. तसेच 10 हजार फटाक्यांची माळ असलेल्या फटाके विक्री करण्यास बंदी राहील. किरकोळ विक्रेत्यांनाही हे नियम लागू असणार आहे. नागरिकांनी फटाके गर्दीच्या ठिकाणी न उडविता मोकळ्या जागेत फोडावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Diwali 2023 : सावधान! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बनावट मिठाईचा धोका! असली-नकली कसं ओळखाल?