नाशिक : किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतीक्षित जवान चित्रपट रिलीज होण्याच्या वाटेवर आहे. तत्पूर्वी जवान चित्रपटाच्या (Jawan) ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. यानंतर जवान चित्रपटाच्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगसाठीसुद्धा गर्दी होऊ लागली आहे. अशातच किंग खानच्या एका ट्विटने नाशिककरांचं लक्ष वेधले आहे. एका ट्विटला रिप्लाय देताना शाहरुख खानने 'थँक्यू नाशिक' (Nashik) असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा असलेल्या शाहरुख खान अभिनित जवान चित्रपटाचा ट्रेलर (Jawan Trailer) रिलीज झाला असून त्यानंतर नेटकऱ्यांकडून शाहरुख खानच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर अवघ्या काही दिवसांवर रिलीज डेट येऊन ठेपल्याने आतापासून अॅडव्हान्स तिकीट बुकिंग सुरु झाली आहे. शाहरुख खानचे जगभरात फॅन्स असल्याने देशभरातून ही तिकीट बुकिंग (Advance Booking) सुरु आहे. अशातच ट्विटरवरील एक ट्विट चांगलंच चर्चेत आले आहे. नाशिकच्या (Nashik) एका चाहत्याने ट्विटरवर जवान चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग केल्याचे ट्विट केले. या ट्विटवर शाहरुख खानने प्रतिक्रिया दिली असून नाशिकच्या चाहत्याचे ट्विट रिट्विट करत 'थँक्यू नाशिक' अशा पोस्ट लिहली आहे.
अभिनेता शाहरुख खान हा ट्विटरवर (Tweeter) नेहमीच अॅक्टिव्ह असतो. अशातच तो #AskSRK या हॅशटॅगखाली आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतो. यातून अनेकदा फॅन्सने केलेल्या ट्विटला रिप्लाय देत तो चाहत्यांची मने जिंकत असतो. अशातच शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित जवान चित्रपट येऊ घातलेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. यानंतर शाहरुख खानने ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी #AskSRK च्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी नाशिकच्या एका चाहत्याने ट्विटरवर शाहरुख खानला #AskSRK या हॅशटॅग खाली टॅग करत नाशिकमधून अॅडव्हान्स बुकिंग झाल्याची पोस्ट केली. यावर शाहरुख खानने 'थँक्यू नाशिक' म्हणत नाशिककरांची आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता जवान चित्रपट पठाण चित्रपटाप्रमाणेच बॉक्स ऑफिवर कोट्यवधींची कमाई करेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई
अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जवान'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी चाहते आतुर असून तिकीट खरेदीही (Jawan Movie Advance Booking) रेकॉर्ड ब्रेक सुरु आहे. जवान चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटाची अॅडव्हान्स बुकींग 1 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. जवान चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जवान चित्रपटाची 2 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो बुकींगवर चाहत्यांचा भर असून पीव्हीआर आणि आयनॉक्स ची 168,000 तिकीटे आणि सिनेपॉलिसमध्ये 35,300 तिकीटांची अॅडव्हान्स बुकींग झाली आहे. आतापर्यंत एकूण पहिल्या दिवशीसाठी 2,03,300 तिकीटांची अॅडव्हान्स बुकींग झाली आहे.
इतर महत्वाची बातमी :