Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स तोडले. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एस आर के (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे. 


शाहरुखच्या एका चाहत्यानं ट्विटरवर त्याला विचारलं,'जेवणं केलं का सर?' यावर शाहरुखनं उत्तर दिलं, 'नाही सध्या पोट भरलेलंच असतं' तर दुसऱ्या युझरनं शाहरुखला विचारलं, 'सर तुमचे एब्स अजूनही आहेत की बटर चिकननं दाबून टाकले.' चाहत्याच्या या मजेशीर प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'टायगर ऑफ असं म्हणतो, 'दुसरो के आते नहीं मेरे जाते नहीं'' शाहरुखनं दिलेल्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 










शाहरुखच्या एका चाहत्यानं ट्वीट करत लिहिलं, 'सर, यावेळी रिप्लाय नाही दिला तर तुम्हाला फॅन-2 तयार करावा लागेल.' या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'जे काय करायचंय ते कर,मी फॅन-2 नाही बनवणार.'






एका ट्विटर युझरनं ट्विटरवर शाहरुखचा मुलगा अबराम आणि दीपिका पादुकोण यांचा फोटो शेअर करुन लिहिलं, 'सर, अबराम हा सेटवर काय करत होते. तो पठाण या चित्रपटाचा असिस्टंट डायरेक्टर आहे का?' या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'नाही तो स्टायलिस्ट होता.' 






पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Dream Girl 2 teaser: ...जेव्हा 'व्हॅलेंटाईन-डे' निमित्त 'पठाण' पूजाला करतो कॉल; 'ड्रीम गर्ल-2' चा टीझर पाहिलात?