नाशिक : गेल्या काही दिवसांत नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून एटीएम फोडून लाखो रुपये लंपास करत असल्याचे या घटनांमधून समोर येत आहे. अशातच मुंबई-आग्रा महामार्गालगत पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड रोड येथील रहदारीच्या ठिकाणी असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम मशिन फोडून (ATM Robbery) चोरट्यांनी अवघ्या तेरा मिनिटांत 28 लाख 35 हजार रुपयांची लूट केल्याची घटना घडली. 


नाशिकसह जिल्ह्यात होत असलेल्या गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमुळे नाशिक शहर पोलिसांसह ग्रामीण पोलीस (Nashik Police) हैराण झाले आहेत. एक घटना होत नाही तोच दुसरी घटना घडत असल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारीचं आव्हान उभे राहिले आहे. त्यातच परराज्यातील टोळ्याही जिल्ह्यात कार्यरत असल्याचे अनेक घटनांवरुन दिसून येत आहे. अशातच पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफुली परिसरातील धन्वंतरी हॉस्पिटल लगत असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन फोडून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी डल्ला मारत जवळपास 28 लाखांची रोकड लंपास केली. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला अन्...


पिंपळगाव बसवंत (Pimplagaon Baswant) शहरातील चिंचखेड चौफुलीवर असलेल्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC ATM) एटीएम शनिवार मध्यरात्री तीनच्या सुमारास तोंडाला मास्क लावून क्रेटा गाडीतून चार चोरटे आले. आधी एक जण आत शिरला, त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला, त्यानंतर काही वेळाने बाहेरची परिस्थितीचा अंदाज घेऊन इतर तीन जणांनी आत प्रवेश केला. त्यांनी गॅस कटर मशीनच्या साहाय्याने एटीएम फोडले. मशीनमध्ये 28 लाख 35 हजार 400 रुपये घेऊन पोबारा केला. फिंगर प्रिंट चेक केल्या आणि जवळच्या मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासून ताब्यात घेण्यात आले आहे. ही एटीएम फोडल्याची घटना अवघ्या तेरा मिनिटांत झाल्याचे समजते.  


गेल्या काही दिवसांत वाढत्या एटीएम चोरी प्रकरणे वाढत असून पोलिसांना परराज्यातील टोळीवर संशय आहे. कारण सातत्याने एटीएम चोरीच्या घटना घडत असून अतिशय शिस्तबद्धरित्या चोरट्यांकडून एटीएम चोरी केली जात आहे. ही टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंग फासून चोऱ्या करत असल्याने टोळीपर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड जात आहे. जिल्ह्यात एटीएम मशीन चोरी प्रकारणांत वाढ झाली असून काही दिवसांपूर्वीच एकलहरेतील एका बँकेच एटीएम मशीनच चोरुन नेण्यात आले होते. ग्रामीण भागातही अशाप्रकारच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींचे गुन्हे दाखल असून ते उघडकीस आणण्यात पोलिसांना आव्हानात्मक ठरत आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Crime : नाशिकमधून चोरट्यांनी आख्खच्या आख्ख एटीएम पळवलं, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद