Nashik Latest Marathi News: एका गुलमोहराच्या वृक्षातून पाण्याचा झरा वाहत असल्याचा नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात व्हायरल होत असून यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातय, कोणी या पाण्याला हातही लावून बघतायत मात्र हा कुठलाही चमत्कार नसून या सर्व अफवा असल्याचं समोर आल आहे. 


सोशल मीडियावर नेटकरी कधी काय व्हायरल करतील याचा काही नेम नसतो, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात आला आहे. नाशिकच्या दिंडोरी परिसरात झाडातून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ फोटो सोशल मिडियात वाऱ्यासारखा व्हायरल झाले. सदर प्रकार रस्त्यालगत असल्याने अनेक दुचाकी धारकांनी या घटनेचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. याचबरोबर स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांनी एकच गर्दी केली. कुणी व्हिडीओ काढतंय तर कुणी सोशल मीडियावर लाईव्ह करण्यासाठी एकच झुंबड उडाली. 


नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या वणी-नाशिक रोडवरील ओझरखेड धरणाजवळ हा प्रकार घडला आहे. येथे रस्त्यालगत असलेल्या गुलमोहराच्या झाडातून पाणी वाहत असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्याच्या निदर्शनास आले. दरम्यान व्हिडिओत दिसून येतंय की गुहामोहराच्या झाडात पिंपळाचे छोटेसे  रोपटे उगवलेले दिसून येत आहे. यातून हे पाणी वाहत असल्याचे दिसत आहे. यावेळी उपस्थित नागरिकांची पाहण्यासाठी एकच गर्दी केली. तर यातील अनेक नागरिकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढले, तर अनेकजणांनी ते पाणी बाटलीत भरून नेले. तर काही जण पाण्याला हात लावून पाहत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसते आहे.


दरम्यान या व्हिडीओत पाणी वाहत असल्याचे दिसते आहे. मात्र व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता असे लक्षात आले की, या गुलमोहराच्या झाडाखालून काही वर्षांपूर्वी पाण्याची पाईपलाइन गेली होती आणि आता हे झाड जूने झाले असून ते वाळल्याने त्यातून पाणी वर येत असल्याचं समोर आल आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक  ग्रामस्थांनी सायंकाळी पाईपलाईन मधील पाण्याचा प्रवाह बंद केला असता झाडातून पाणी येणंही बंद झाले होते. त्यामुळे दिवसभर व्हायरल झालेल्या व्हिडिओ नेमकं कारण समोर आले.


दरम्यान या घटनेमुळे परिसरसह जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता, झाड असलेल्या परिसरातील पाईपलाईन तुटल्याने पाण्याला अन्य ठिकाणाहून जागा न मिळत नसल्याने ते पाणी झाडाच्या खोडांतुन बाहेर पडत आहे. तसेच गुलमोहरांचे झाड जीर्ण स्वरूपांचे असल्याने पाण्यांचा प्रवाह त्यातुन वाहात आहे. तरी नागरिकांनी अफावांवर विश्वास ठेवु नये, असे स्थानिक जेष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितले.


आणखी वाचा:
Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या निषेध ठरावात नेमकं आहे तरी काय? सीमावाद आणखी वाढणार??