नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुका (Grampanchyat Election) पार पडल्या असून निकाल जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायती पैकी 3 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या होत्या. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला होता. राष्ट्रवादी पक्षात फूट पाडल्यानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यात अजित पवार गटाचा करिष्मा पाहायला मिळाला. अजित पवार गटाने सर्वाधिक 12 जागांवर विजय मिळवला. एकूणच महायुतीला 23 ग्रामपंचायत, तर महाविकास आघाडीला 13  ग्रामपंचायत जिंकता आल्या आहेत. मनसेला 2 तर इतर आणि अपक्षांना 9 जागा मिळाल्या आहेत.


दरम्यान एकूण ग्रामपंचायत - 48 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यात भाजपला 05 जागा, शिंदे गटाला 06 जागा, अजित पवार गटाला 12 जागा, उद्धव ठाकरे गटाला 06, काँग्रेसला 04, शरद पवार गटाला 03, मनसेला 02, इतर - 09 जागा अशी निवडणूक पाहायला मिळाली. तर एक जागेची निवडणूक स्थगित झाली असून यात इगतपुरी तालुक्यातील बोरटेंबे या गावात अर्ज न दाखल झाल्याने केवळ सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली.


तर सरपंच पदाच्या 05 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यात निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील ठाकरे गटाच्या सुरेखा चव्हाण, मनसेच्या जिव्हाळे येथील संगिता गायकवाड, घोटी खुर्द येथील काँग्रेसचे माणिक बिन्नर, पेठ तालुक्यातील तिर्ढे येथील अपक्ष उमेदवार नितीन गायकवाड यांची सरपंच पदी निवड झाली आहे. तर येवला तालुक्यातील जऊळके येथील सरपंच पदाची पोटनिवडणूक रद्द झाली आहे. त्यानुसार एकूण 5 सरपंच पदापैकी 4 घोषित करण्यात आले.


नाशिक जिल्ह्यात जिंकत अजित पवारांची दादागिरी


दरम्यान नाशिक जिल्ह्यात 12 जागा जिंकत अजित पवारांची दादागिरी पाहायला मिळाली असून छगन भुजबळ यांनी आपला गड राखला आहे. येवल्यातील दोन्ही ग्रामपंचायतीवर भुजबळ अजित पवार गटाची सत्ता स्थापन झाली आहे. एकूण 48 जागांचा निकाल पाहता उबाठा 6 तर शरद पवार गटाला 3 जागांवर यश मिळाले आहे. शिंदे गटाला 6 तर भाजप 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे.


हेही वाचा : 


Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायतीमध्ये महायुतीची सरशी तर मविआची पिछेहाट; भाजपची बाजी, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर