राज्यात रविवार (5 नोव्हेंबर) रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे कौल आज समोर आलेत. यामध्ये अनेकांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसेच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुतीने सरशी केली तर महाविकास आघाडीची पिछेहाट झाली. नागपूर, बारामतीसह अनेक गड महायुतीने काबीज केले. राज्यातील  2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election 2023) नव्या कारभारींची निवड करण्यासाठी आज मतदान पार पडले होते. त्यानंतर सोमवार (6 नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर गावकऱ्यांना दुपारी साडेबारा वाजेपर्यंत त्यांचा कारभारी मिळाला. 


यामध्ये 600 पेक्षा अधिक जागा मिळवून भाजपने अव्वल क्रमांक पटकवला आणि त्यामागे अजित पवार गटाने नंबर लावला. 350 पेक्षा अधिक जागांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केलंय. त्याचप्रमाणे बारातमीचा गडही अजित पवारांनी राखल्याचं चित्र आहे. त्याखालोखाल शिंदे गटाने 250 पेक्षा जास्त जागांवर त्यांचा उमेदवार निवडून आणला. त्यामुळे 1000 पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा डंका वाजलाय. 


पुण्यात अजित पवार गटाचा करिश्मा


 पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर (gram panchayat election) झाला आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार गटानं यंदा बाजी मारली आहे. अजित पवार गटाने 109 जागेवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर त्यानंतर 34 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. कॉंग्रेसने 25, शिंदे गट 10 , ठाकरे गट 13, शरद पवार गट 27, इतर 11 अशा एकूण 229 जागांवर विजय मिळवला आहे. 231 पैकी दोन जागा रिक्त आहे. एक मुळशीमध्ये तर एक भोरमधील जागेचा समावेश आहे. 


काटेवाडीत अजित पवारांचं वर्चस्व, पण भाजपचा पहिल्यांदाच शिरकाव
बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत  अजित पवार गटाला  घवघवीत यश प्राप्त झालं आहे. काटेवाडीत 16 पैकी 14 जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर भाजपनं (BJP) पहिल्यांदाच काटेवाडीत शिरकाव केला आहे. भाजपने काटेवाडीत 2 जागा जिंकल्या आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच अव्वल


छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 16 जागांसाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपला 4, शिंदे गटाला 3, ठाकरे गटाला 1, अजित पवार गटाला 3 जागा मिळाल्यात. शरद पवार गटाला छत्रपती संभाजी नगरमध्ये खातंच उघडता आलं नाही.


बीडमध्ये अजित पवार गटाचा कारभारी


बीडमधील माजलगाव तालुक्यातील 32 पैकी 23 ग्रामपंचायतीवर आमदार प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व. प्रस्थापित झाले आहे. माजलगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्या आहेत. माजलगाव तालुक्यामध्ये एकूण 42 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार होते. मात्र यापैकी नऊ ग्रामपंचायती निवडणुकीवर मराठा समाजाचे आरक्षणाच्या प्रश्नावरून बहिष्कार टाकण्यात आला होता. 32 पैकी 23 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विजय मिळवला. 


सिमरी पारगाव ,मंजरथ, काळेगाव थडी ,मंगरूळ, रिधोरी ,घळाटवाडी, शिंदेवाडी ,कोथरूळ साळेगाव ,खानापूर, सांडस चिंचोली, तेलगाव खुर्द ,फुले पिंपळगाव, तालखेड ,टाकरवन, केसापुरी ,भाटवडगाव, वांगी, लवूळ, पात्रुड सर् वर  पिंपळगाव, सोमठाणा ,लुखेगाव या ग्रामपंचायतीचा समावेश यामध्ये करण्यात आलाय.


रायगड जिल्ह्याचा अंतिम निकाल 


1 ) पेण ( एकूण 11 ) - भाजप 9, इंडिया आघाडी 1, शिवसेना, भाजप आघाडी 1


 2 ) खालापूर ( एकूण 22 ) - उबाठा 6, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5, शरद पवार गट  2, काँग्रेस  1, भाजप महायुती - 2,  अनेक विकास आघाडी - 1


 3 ) रोहा ( एकूण 12 ) - राष्ट्रवादी काँग्रेस 7, स्थानिक विकास आघाडी - 1,  शिवसेना - 1, उबाठा - 1, शेकाप - 1, शरद पवार गट - 1


 4 ) महाड ( एकूण 21 ) - शिवसेना - 17, ग्रामविकास आघाडी - 1 , उबाठा - 3


 5 ) पोलादपूर ( एकूण 22 ) - शिवसेना 17, शेकाप - 2, उबाठा - 3


 6 ) म्हसळा ( एकूण 12 ) - राष्ट्रवादी काँग्रेस  - 11, स्थानिक विकास आघाडी - 1


 7 ) तळा ( एकूण 6 ) - राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) - 5, उबाठा - 1 
 
 8 ) माणगाव ( एकूण 26 ) -* राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) - 13, भाजप -1, उबाठा - 1, शिवसेना - 8, शेकाप - 1, इतर - 2


9 ) श्रीवर्धन ( एकूण 8 ) - राष्ट्रवादी काँग्रेस  - 6, शिवसेना- 1, इतर - 1


10 ) अलिबाग ( एकूण 15 ) - शेकाप - 8, काँग्रेस - 2, शिवसेना - 3, राष्ट्रवादी काँग्रेस - 1, इतर - 1


11 ) पनवेल ( एकूण 17 ) - शेकाप - 9, भाजप - 6, इतर - 2


12 ) सुधागड ( एकूण 13 ) - भाजप - 6, भाजप आघाडी - 2, उबाठा - 2, शेकाप - 2, शिवसेना - 1


 13 ) उरण ( एकूण 3 ) - शेकाप - 3 


 14 ) मुरुड ( एकूण 15 ) - भाजप - 2, राष्ट्रवादी काँग्रेस - 1, उबाठा - 3, शिवसेना - 4, शेकाप - 4, अपक्ष - 1


 15 ) कर्जत ( एकूण 7 ) -  राष्ट्रवादी - 1, शिवसेना 6


नांदेडमध्ये बीआरएसची जागा विजयी


नांदेडमध्ये बीआरएस पक्षाची जागा निवडून आली आहे. नांदेडमध्ये भाजपच्या एकूण सात जागा निवडून आल्या आहेत. तर काँग्रेसच्या एकूण 3 जागांची सरशी झालीये. 


नागपुरात भाजपचं वर्चस्व


नागपुरात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. भाजपनंतर नागपुरात काँग्रेसच्या 96 जागेवर उमेदवार निवडून आलेत. तसेच नागपुरात शिंदे गटाचे 13, अजित पवार गट  2 उमेदवार निवडून आलेत. त्यानंतर शरद पवार गटाच्या 47 आणि उद्धव ठाकरे गटाचे 6 उमेदवार निवडून आलेत. 


हेही वाचा : 


Gram Panchayat Election Results LIVE Updates: जामनेर मतदार संघावरती गिरीश महाजनांचा एकतर्फी विजय, सर्व 17 ग्रामपंचायतीवर निर्विवाद यश