नाशिक : नाशिकमधून (Nashik) एक मोठी बातमी समोर येत असून काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे (manoj Jarange) यांच्या येवल्यातील सभेवेळी अपघाताची घटना घडली होती. यात घटनेत चार मराठा बांधव जखमी झाले होते. यातील कोपरगाव (Kopargaon) तालुक्यात उपचार घेत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तब्बल महिनाभरापासून या तरुणावर उपचार सुरु होते, तसेच काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी देखील भेट घेतली होती. या तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. 


मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा आजही सुटलेला नसून राज्य सरकारने यावर दोन महिन्याची मुदत घेतली आहे. तर मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे उपचार घेत आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे महाराष्ट्र दौरे करत होते. यावेळी त्यांची येवल्यात जाहीर सभा आजोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील येवला (Yeola) येथे सभेसाठी आल्यानंतर त्यांच्यावर जेसीबीतून काही युवकांनी पुष्पवृष्टी केली. त्यावेळी जेसीबीतून पडून चार जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होतो. या चारही युवकांवर येवला, नाशिक, कोपरगाव आदी ठिकाणी उपचार सुरू होते. त्यातील गोकुळ कदम या तरुणाचा मृत्यू झाला झाल्याचे समोर आले आहे. या तरुणावर गेल्या महिनाभरापासून कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. 


येवला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जरांगे यांची 9 ऑक्टोबरला जाहीर सभा होती. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जेसीबीच्या साहाय्याने पुष्प उधळण करण्यात येत होती. त्यावेळी गर्दी झाल्याने जेसीबीच्या ऑपरेटरला अज्ञात व्यक्तीचा धक्का लागला. जेसीबी मशीनच्या समोरील बकेट खाली झुकली गेली. यावेळी जेसीबीवर असलेल्या बकेटमधून पुष्टवृष्टी करणारे चारही तरुण खाली कोसळले. चौघांनांही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात येवला तालुक्यातील नेऊरगांव येथील तिघे तरुण होते. यापैकी अरुण बोराडे यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर गोकुळ कदम याच्यावर कोपरगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. अन्य एकावर येवला तालुक्यातच उपचार सुरु होते. दरम्यान कोपरगाव येथे उपचार घेत असलेल्या गोकुळ कदम याचा मृत्यू झाला आहे. 


काय घडलं होत नेमकं? 


मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) राज्याचा दौरा करत होते. त्यावेळी गावागावात, चौकाचौकात मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतही होत होते. येवल्यात सभा असताना अशाच प्रकारे स्वागतासाठी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करण्यात येत होती. याचवेळी फुलांची उधळण सुरु असताना अचानक जेसीबीच्या बकेटवरील ऑपरेटरचे नियंत्रण सुटल्याने चार कार्यकर्ते खाली पडून गंभीर जखमी झाले. यात गोकुळ कदम याचाही समावेश होता. दरम्यान अपघातानंतर काही दिवसांनी स्वतः मनोज जरांगे यांनी कोपरगाव येथे जाऊन कदम यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. 


इतर महत्वाची बातमी : 


Manoj Jarange : मनोज जरांगेवर फुलांची उधळण करताना कार्यकर्ते जेसीबीच्या बकेटमधून पडल्याने जखमी, येवल्यातील प्रकार