Nashik Gram Panchayat Election Result 2022 : नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतीचा निकाल एका क्लिकवर, पहा निकालाचे अपडेट

Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

गोकुळ पवार Last Updated: 20 Dec 2022 04:53 PM
Nashik Grampanchayat : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचं घड्याळ एक नंबरवर, सर्व जागांचा निकाल जाहीर, कुणाला किती जागा! 

Nashik Grampanchayat : अवघ्या नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, त्या पाठोपाठ भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलय तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत, छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य संघटनेन चंचू प्रवेश करत 3 जागी संघटनेचा भगवा फडकविला आहे.  

Nashik Grampanchayat : नांदगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचातींचा निकाल, शिंदे गटाची सरशी 

Nashik Grampanchayat : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून यामध्ये लक्ष्मीनगर मीराबाई शंकर उगले (शिंदे गट), धोटने ग्रामपंचायत शरद अशोक काळे (शिंदे गट), भार्डी अनिता अशोक मार्कड (राष्ट्रवादी काँग्रेस), हिरेनगर मंगल श्रावण बिंनर (शिदे गट), बोयेगाव बबन पोपट शेरमळे (शिंदे गट), लोढरे ज्योती प्रमोद निकम (शिंदे गट) असे विजयी उमेदवार आहेत. अद्यापही दहा ग्रामपंचायतींचा निकाल बाकी असल्याचे समजते. 

Nashik Gram panchayat Result : दिंडोरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल, शिवसेना ठाकरे गटाची बाजी 

Nashik Gram panchayat Result : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे जनसेवा पॅनलने बाजी मारली असून शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख विजय विलास केदार व जेष्ठ नेते जे डी केदार यांच्या पॅनलला मोठे यश असून सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच निळवंडीच्या सरपंच पदी चारोस्कर विजयी झाले आहेत. शिंगवे येथे गोकुळ गीते यांच्या जय मल्हार पॅनलला मोठे यश आले असून 11 जागांसह सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

Nashik Gram panchayat Result : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मोठा धक्का, येवला मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व 

Nashik Grampanchayat Result : नाशिक जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या येवला मतदारसंघातील ग्रामपंचायतींचा धक्कादायक निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मोठा धक्का यांना धक्का बसला असून अनेक वर्षांची सत्ता गमावली आहे. भुजबळांच्या येवला मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले असून सात पैकी फक्त एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय मिळवता आला आहे. 

Nashik Grampanchayat Result : इगतपुरीच्या दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर, समान मते पडल्याने काढली चिठ्ठी

Nashik Grampanchayat Result : इगतपुरी तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून मुंढेगाव सरपंच पदी ठाकरे गटाच्या मंगला चंद्रकांत गतीर तर वासाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीच्या सुनीता काशिनाथ कोरडे या विजयी झाल्या आहेत. 
दरम्यान वासाळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार प्रतिभा कचरे आणि मोनिका भालेराव यांना 239 मते पडली. तर यावेळी चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. कस्तुरी वैभव बोरकर या विद्यार्थिनीने चिठ्ठी काढली असता मोनिका भालेराव या विजयी झाल्या. निकाल जाहीर झाल्यावर मोनिका भालेराव यांना आनंदाश्रू अनावर झाले, यावेळी त्यांनी चिठ्ठी काढणाऱ्या मुलीला मिठी मारून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Nashik Gram Panchayat Result : कोटमगाव सरपंच पदी राजेंद्र काकळीज, नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेचा पहिला विजय 

Nashik Gram Panchayat Result : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कोटमगाव सरपंच पदी स्वराज्य संघटनेचे राजेंद्र काकळीज यांचा विजय झाला असून देवळा तालुक्यातील वासोळा येथील सदस्य भारत आहिरे विजयी झले आहेत. 

Maharashtra Grampanchyat Result 2022 : शिरपूरच्या सर्व ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ, भाजपचे अमरीश पटेल यांचे वर्चस्व

Maharashtra Grampanchyat Result 2022 : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सगळ्या 17 ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले असून अमरीश पटेल यांना वर्चस्व कायम राखण्यात यश आले आहे. 


 

Nashik Grampanchayat Result : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का, दहा वर्षांनंतर ठाकरे गटाचा सरपंच 

Nashik Grampanchayat Result : नाशिक जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायती धक्कादायक निकाल हाती आला आहे. निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्तीय दिलीप बनकर यांना धक्का बसला असून पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीवरील दहा वर्षांची सत्ता गमावली आहे. तर या ग्रामपंचायतीवर थेट सरपंच पदी ठाकरे गटाचे भास्कर बनकर विजयी झाले आहेत. 

Nashik Grampanchyat: चांदवडमध्ये दहा पैकी 5 ग्रामपंचायतीवर भाजप उमेदवार विजयी, आमदार राहुल आहेर यांचे वर्चस्व

Nashik Grampanchayat : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात पहिल्या दोन फेरीचे निकाल हाती आले असून दहा पैकी 5 ग्रामपंचायतीवर भाजप प्रणित उमेदवार विजयी झाले आहेत.  त्यामुळे भाजप आमदार राहुल आहेर यांचे वर्चस्व दिसून आले असून काँग्रेस दोन, राष्ट्रवादी एक, महाविकास आघाडी एक तर ईतर एक अशी इतर जागांवर विजयी उमेदवार आहेत. 

Nashik Grampanchayat : कळवण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीचे निकाल हाती, चार जागांवर राष्ट्रवादीचे घड्याळ 

Nashik Grampanchayat : कळवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला असून आतापर्यंत सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 4, माकप 3, भाजप 2 अशी निकाल हाती आला आहे. 

Nashik Grampanchayat Result : नाशिक तालुक्यातील 13 पैकी जागांचा निकाल हाती, सर्वाधिक जागांवर ठाकरे गटाचा विजय

Nashik Grampanchayat Result : नाशिक तालुक्यातील 13 पैकी जागांचा निकाल हाती आला असून यामध्ये सर्वाधिक जागांवर ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. तर शिंदे गटाला दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. यामध्ये  शिंदे गटाला ०२, ठाकरे गट ०५, भाजप ०२ , काँग्रेस ०१, राष्ट्रवादी ०१ आणि इतर २ अशी जागांवर उमेदवारांनी विजयी मिळवला आहे. 

Nashik Grampanchayat Result : दादा भुसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय, मालेगावमध्ये भाजपने खाते उघडले. 

Nashik Grampanchayat Result : नाशिक जिल्ह्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या मालेगाव तालुक्यातील पहिला निकाल हाती येत आला असून शिंदे गटाचे मंत्री दादा भूसेंच्या मालेगावमध्ये भाजपने खाते उघडले आहे. चौकट पाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे समाधान पवार विजयी झाले आहेत. तर सटाणा तालुक्यातील मतमोजणी संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

Nashik Grampanchayat : देवळा तालुक्यावर भाजपाचे कमळ, 13 पैकी 11 ग्रामपंचायतींवर भाजपाचा विजय 

Nashik Grampanchayat : नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा निकाल हाती आला असून देवळा तालुक्यावर भाजपाने कमळ फुलविले आहे. या तालुक्यातील 13 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे देवळा तालुक्याचा बालेकिल्ला पुन्हा भाजपाच्या ताब्यात गेला आहे. देवळा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत मध्ये पौर्णिमा सावंत भाजप विजयी झाल्या असून देवळा तालुक्यात भाजपचे वर्चस्व आले. तर 1 राष्ट्रवादी 1 अपक्ष अशी जागा विजयी झाल्या आहेत. 

Nashik Grampanchayat Election : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक , आतापर्यतच्या ग्रामपंचायतींचा निकाल

Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Election) निकाल घोषित होत असून आतापर्यत काही ग्रामपंचायतींचा निकाल (Grampanchayat Election Result) हाती आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात भाजपाची (BJP) सरशी असून त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे घड्याळ सुसाट आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना (Shivsena), शिंदे गट आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. अद्याप संपूर्ण निकाल येणे बाकी असून जिल्ह्यातील एक एक ग्रामपंचायतीचे निकाल हाती येत आहेत. 

पार्श्वभूमी

Nashik Gram Panchayat Election Result 2022 Live : नाशिकमध्ये (Nashik) थोड्याच वेळात संबंधित तहसील कार्यलयात (Tahsil Office) 10 वाजता मतमोजणीला (Counting) सुरवात होणार आहे. नाशिक तहसील कार्यालयात 13 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. अर्धा तासात पहिला निकाल हाती लागणार असून सर्वच ठिकाणी मतमोजणी केंद्रा बाहेर चोख पोलीस बंदोबस्त (Police Security) तैनात करण्यात आला आहे. 


नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 14 तालुक्यांतील 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पडली. आज रिंगणात असलेल्या 3 हजार 474 उमेदवारांचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. आज सकाळपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात ओट असून पहिला निकाल अर्धा तासात हाती येणार आहे. त्यामुळे मतपेटीत भवितव्य बंद झालेल्या हजरो उमेदवारांच्या मनात धाकधूक आहे. तर दुसरीकडे आतापासूनच कार्यकर्ते, नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतो आहे.नाशिक जिल्ह्यात रविवारी मतदानाही टक्केवारी घसरल्याचे दिसून आले. कारण जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के मतदान झाले. 


दरम्यान आज मतमोजणीचा कार्यक्रम संबंधित तहसील कार्यालयात सुरु आहे. तर नाशिक तालुका तहसील कार्यालयात 13 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. शिवाय पुढील अर्धा तासात पहिला निकाल हाती लागणार असून सर्वच ठिकाणी मतमोजणी केंद्रा बाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे यासह अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती असल्याने पोलीस यंत्रणेने अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली असून संवेदनशील गावांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात 34 पैकी नारायणगाव ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. आहे. एकूण 8 फेरी होणार दुपारी दोन वाजेपावेतो सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.










 



 





 

 


 

 

 





 



 




 

 






 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.