Gopichand Padalkar : 'कमरेखाली बोलायची आम्हाला गरज नाही, राष्ट्रवादी वाल्यांनाच हे विचारा.. शरद पवार आणि रोहित पवार यांचा चौडीत यांचा संबंध काय? महत्वाचे म्हणजे शरद पवारांचे आता वय झालंय, त्यांनी घरी बसावं.' अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमध्ये केली आहे. 


आपल्या वादग्रस्त वाणीमुळे नेहमी चर्चेत असणारे गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे. कांदा परिषदेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.


नाशिकच्या निफाड तालुक्यात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ही कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती. या कांदा परिषदेतही 'कांदा बाजूलाच राहिला' अन राजकीय भाषणांचा जोर पाहायला मिळाला. दरम्यान या कांदा परिषदेनंतर आज नाशिकमध्ये पडळकरांनी पत्रकारांशी संवाद साधला.  त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा खालच्या स्तरावर जाऊन टीका केली.


वय झालंय घरी बसा!
यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले की, कोणाचे वय किती झाले? याच्याशी मला घेणं देणं नाही.. वय झालं तरी घरी बसा.. प्रमुख म्हणून मिरवताच ना? म्हणून शरद पवारांचे वय झालं आहे, त्यांनी घरी बसावं. यापुढे जाऊन पडळकर म्हणाले की, जे सरकारचे करते धरते आहे, त्यांच्यावर टिका झाली तर वाईट वाटून घेऊ नका.


पूर्वी घाबरायचो, आता नाही!
गोपीचंद पडळकर शेवटी म्हणाले की, शरद पवार नावाला नाही तर प्रवृत्तीला आमचा विरोध असून पूर्वीचा काळ वेगळा होता, तुम्हाला घाबरायचे पण आता नाही. यापुढे जात पडळकर म्हणाले की, पडळकरची मी औलाद आहे, म्हणूनच शरद पवारला नडतोय, असे गंभीर विधानही त्यांनी यावेळी केले.


संबंधित बातम्या